lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Baba Ramdev Ruchi Soya : रामदेव बाबांच्या ‘रुची सोया’ शेअरमध्ये हेराफेरी

Stock Market Baba Ramdev Ruchi Soya : रामदेव बाबांच्या ‘रुची सोया’ शेअरमध्ये हेराफेरी

नऊ कंपन्यांना २५ लाख रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 09:36 AM2022-05-04T09:36:31+5:302022-05-04T09:36:59+5:30

नऊ कंपन्यांना २५ लाख रुपयांचा दंड

Stock Market Manipulation in Ramdev Babas Ruchi Soya shares investors loss sebi | Stock Market Baba Ramdev Ruchi Soya : रामदेव बाबांच्या ‘रुची सोया’ शेअरमध्ये हेराफेरी

Stock Market Baba Ramdev Ruchi Soya : रामदेव बाबांच्या ‘रुची सोया’ शेअरमध्ये हेराफेरी

नवी दिल्ली :  बाबा रामदेव यांच्या रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभागांमध्ये दहा वर्षांपूर्वी फेरफार केल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) नऊ कंपन्यांना २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बाजार नियामकाने २९ एप्रिल रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशात, अवेंतीस बायोफिड्स प्रा. लि., नविन्या मल्टिट्रेड, युनी २४ टेक्नो सोल्युशन, सनमेट ट्रेड, श्रेयन्स क्रेडिट अँड कॅपिटल, बैतुल ऑईल्स, बैतुल मिनरल्स, व्हिजन मिलेनियम एक्सपोर्ट्स आणि मोबियस क्रेडिट अँड कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांना २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला  आहे.
२०१९ मध्ये दिवाळखोरीत गेलेल्या रुची सोयाला रामदेव बाबा यांनी ताब्यात घेतले होते. यातही सरकारी बँकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान 
खरेदीदारांच्या स्वरुपात तीन संस्थांनी रुची सोयाचे समभाग लास्ट ट्रेडेड प्राइसपेक्षा अधिक किमतीने खरेदी केले होते. यावेळी दलालांनी फायदा घेत एकाच वेळी समभागांची विक्री केली. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नाहक नुकसान झाले होते, असे सेबीला तपासात आढळले होते.

Web Title: Stock Market Manipulation in Ramdev Babas Ruchi Soya shares investors loss sebi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.