lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर निर्देशांकाने घेतली ६२२ अंशांची उसळी, जगभरात संमिश्र वातावरण

शेअर निर्देशांकाने घेतली ६२२ अंशांची उसळी, जगभरात संमिश्र वातावरण

मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या व्यवहारांचा प्रारंभच तेजीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे १५० अंश वर खुला झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:32 AM2020-05-21T01:32:08+5:302020-05-21T01:33:43+5:30

मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या व्यवहारांचा प्रारंभच तेजीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे १५० अंश वर खुला झाला.

The stock index rose 622 points, mixed worldwide | शेअर निर्देशांकाने घेतली ६२२ अंशांची उसळी, जगभरात संमिश्र वातावरण

शेअर निर्देशांकाने घेतली ६२२ अंशांची उसळी, जगभरात संमिश्र वातावरण

मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये संमिश्र वातावरण असले तरी मुंबई शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण राहिले. निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली असून, निफ्टीने नऊ हजार अंशांचा टप्पा पार केला आहे. एचडीएफसी आणि रिलायन्ससारख्या निवडक समभागांना मोठी मागणी असल्याने निर्देशांकांच्या वाढीला हातभार लागला आहे.
मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या व्यवहारांचा प्रारंभच तेजीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे १५० अंश वर खुला झाला. त्यानंतर तो ३०,८७८.३१ ते ३०,१५७.७५ दरम्यान, हेलकावत बाजार बंद होताना ३०,८१८.६१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात ६२२.४४ अंश म्हणजे २.०६ टक्क्यांनी वाढ झाली.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी ३६ अंश वाढीने सुरू झाला. दिवसअखेरीस तो १८७.४५ अंश म्हणजेच २.११ टक्क्यांनी वाढून ९,०६६.५५ अंशांवर बंद झालेला दिसून आला.
संवेदनशील निर्देशांकामधील एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅँकेसह रिलायन्सचे समभाग तेजीत राहिले. याबरोबरच महिंद्र अ‍ॅण्ड
महिंद्र, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील, बजाज फायनान्स, सन फार्मा या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. इंडसइंड बॅँक, हिरो मोटोक्रॉप, भारती एअरटेल आणि एशियन पेंट्स या समभागांच्या किमती कमी झालेल्या दिसून आल्या.

- युरोपातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण होते. त्याचप्रमाणे आशियातील शेअर बाजार संमिश्र राहिले. हाँगकाँग, टोकिओ आणि सेऊल येथील बाजारांमध्ये वाढ झालेली दिसून आली तर शांघाय येथील शेअर बाजार खाली येऊन बंद झाला.

Web Title: The stock index rose 622 points, mixed worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.