lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी

जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 06:27 PM2018-10-17T18:27:21+5:302018-10-17T18:29:07+5:30

जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे.

Soon You Will Be Able to Transfer Money from Paytm Wallet to Another Mobile Wallet | Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी

नवी दिल्ली- जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे. मोबाइल वॉलेट असलेल्या पेटीएमच्या माध्यमातून तुम्ही आता बँकेतही पैसे वळते करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे पेटीएमच नव्हे, तर डिजिटल वॉलेटच्या कुठल्याही कंपन्यांच्या माध्यमातून वापरकर्ते सरकारी बँक किंवा पोस्टात पैसे पाठवू शकणार आहेत.

याचाच अर्थ तुम्हाला पेटीएमच्या माध्यमातून फोनच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला आरबीआयच्या निर्णयामुळे पाठवता येणार आहे. RBIच्या अधिसूचनेनुसार, केवायसीचं पालन करणा-या डिजिटल वॉलेट कंपन्या परस्पर पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. तसेच यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या यंत्रणेमार्फत तुम्ही एकमेकांना पैसे पाठवू शकता. 

UPIच्या माध्यमातून बँक खातं आणि इतर वॉलेटमध्ये करता येणार पैसे वळते
कार्ड नेटवर्कच्या माध्यमातूनही तुम्ही डिजिटल वॉलेटद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)चा वापर करावा लागणार आहे. देशातील जवळपास 50 कंपन्यांजवळ प्री-पेड पेमेंट इन्स्ट्र्युमेंट (PPI, डिजिटल वॉलेट)चा परवाना आहे. विशेष म्हणजे मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल पेमेंट्स केल्यास तुम्हाला कोणताही चार्ज म्हणजे अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे देशातील डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतातल्या डिजिटल पेमेंट्स वापरणा-या ग्राहकांची संख्या वाढणार असून, डिजिटल कंपन्यांच्या व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वृद्धी होणार आहे. 

Web Title: Soon You Will Be Able to Transfer Money from Paytm Wallet to Another Mobile Wallet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.