lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ... तर पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी

... तर पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी

कार्ड चोरी झाल्यास तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:50 AM2024-02-17T05:50:32+5:302024-02-17T05:51:18+5:30

कार्ड चोरी झाल्यास तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.

...So PAN holders are fined ten thousand; Be careful while using the pan | ... तर पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी

... तर पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी

नवी दिल्ली : पॅन क्रमांकाचा वापर करताना करदात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीचा पॅन क्रमांक टाकल्यास दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. पॅन क्रमांकाविषयीचे आयकर विभागाचे नियम खूप कडक आहेत. विशेषत: आयकर विवरणपत्र भरताना अचूक पॅन क्रमांक नाेंदविणे आवश्यक आहे. अन्यथा दंड भरावा लागू शकतो. 

कार्ड चोरी झाल्यास तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तुमचे कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास फसवणूक अथवा घोटाळ्यासाठी वापर होऊ शकतो. एकापेक्षा अधिक पॅन कार्ड बाळगणेही गुन्हा आहे. तुमच्याकडे दोन कार्ड असल्यास एक कार्ड तत्काळ आयकर विभागास परत करा. अन्यथा आयकर विभाग तुमचे एक कार्ड रद्द करून तुम्हाला दंड ठोठावू शकतो.

Web Title: ...So PAN holders are fined ten thousand; Be careful while using the pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.