lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहतूक नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ- नितीन गडकरी

वाहतूक नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ- नितीन गडकरी

सुधारीत मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अनेक राज्यात वाहन परवाना मागणाऱ्यांचे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांनी वाढले आहे. प्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:34 AM2019-09-20T05:34:40+5:302019-09-20T05:34:52+5:30

सुधारीत मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अनेक राज्यात वाहन परवाना मागणाऱ्यांचे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांनी वाढले आहे. प्र

 Significant increase in the number of people who follow the rules of traffic - Nitin Gadkari | वाहतूक नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ- नितीन गडकरी

वाहतूक नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ- नितीन गडकरी

- सुमेध बनसोड 
नवी दिल्ली : सुधारीत मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अनेक राज्यात वाहन परवाना मागणाऱ्यांचे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांनी वाढले आहे. प्रदूषण प्रमाणपत्र मागणाºयांचे प्रमाण ३०० ते ९०० टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत केला. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांसंबंधी जागरुकता आली आहे. यंत्रणेत कुठला भष्ट्राचार होत असेल, तर नागरिकांनी तो पकडलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रस्ते सुरक्षा कायद्यासंबंधी जागरुकता आणण्यासाठी टीसीआय कंपनीने ‘सेफ सफर’ अभियान सुरु केले आहे. अभियानाच्या रथाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. हा रथ विविध राज्यात फिरुन विविध कार्यक्रमातून वाहतूक नियमांसंबंधी जागृती करणार आहे.
नव्या कायद्यातील दंडाच्या रकमेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, मात्र नियमांचे योग्य पालन केल्यामुळे दिल्लीतील प्रदूषणात घट झाली आहे. प्रभावी अंमलबजावणीमुळे हे शक्य झाले. नियमांचे पालन करणाºयांना कुठलाही त्रास होणार नाही. लोकांनी कायद्यामागचा भाव लक्षात घेतला पाहिजे. सुधारीत कायद्यामुळे लाखो चालकांचे प्राण वाचतील. अनेकांना दिव्यांगत्व येणार नाही. कुटुबं उध्वस्त होणार नाहीत आणि राष्ट्रीय सकल उत्पादनाचे नुकसान होणार नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
नागरिकांचा संरक्षणासाठीच हा कायदा लागू करण्यात आला. कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वसंयेवी संस्थांनी समोर येवून नागरिकांना जागरुक केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.
>गडकरीनांही चालान
व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इन्फ्रोर्समेंटवर भर दिला जात आहे.जागोजागी लागलेल्या कॅमेºयांत वाहतुकीचे नियम मोडणाºयांविरोधात कारवाई केली जात आहे. भष्ट्राचाराची शक्यता त्यामुळे उरणार नाही. वरळी सी लिंक वरुन भरधाव वेगात वाहन चालवल्याने आपल्यालाही दंड भरावा लागल्याचे गडकरी म्हणाले.

Web Title:  Significant increase in the number of people who follow the rules of traffic - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.