Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आई-वडिलांसाठी विमा घेताय का? ‘या’ चुका टाळाल, तरच आहे फायदा

आई-वडिलांसाठी विमा घेताय का? ‘या’ चुका टाळाल, तरच आहे फायदा

पूर्वीच्या आजारांकडे दुर्लक्ष महागात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार असणे सामान्य आहे. अनेकदा प्रीमिअम वाढेल या भीतीने किंवा पॉलिसी नाकारली जाईल या भीतीने हे आजार लपवले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:47 IST2026-05-04T09:46:20+5:302026-05-04T09:47:38+5:30

पूर्वीच्या आजारांकडे दुर्लक्ष महागात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार असणे सामान्य आहे. अनेकदा प्रीमिअम वाढेल या भीतीने किंवा पॉलिसी नाकारली जाईल या भीतीने हे आजार लपवले जातात.

Should you take out insurance for your parents? Only if you avoid these mistakes will it be beneficial | आई-वडिलांसाठी विमा घेताय का? ‘या’ चुका टाळाल, तरच आहे फायदा

आई-वडिलांसाठी विमा घेताय का? ‘या’ चुका टाळाल, तरच आहे फायदा

जसे वय वाढेल तसे आरोग्याच्या तक्रारी वाढणे नैसर्गिक आहे. आजच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च पाहता, ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य ‘हेल्थ इन्शुरन्स’ असणे ही चैन नसून गरज बनली आहे. मात्र, अनेकदा माहितीच्या अभावामुळे आपण चुकीची पॉलिसी निवडतो आणि ऐनवेळी पदरी निराशा पडते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा घेताना कोणत्या चुका टाळाव्यात, याचा हा आढावा.

पूर्वीच्या आजारांकडे दुर्लक्ष महागात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार असणे सामान्य आहे. अनेकदा प्रीमिअम वाढेल या भीतीने किंवा पॉलिसी नाकारली जाईल या भीतीने हे आजार लपवले जातात. ही सर्वांत मोठी चूक आहे. क्लेमच्या वेळी जर विमा कंपनीला जुन्या आजाराची माहिती मिळाली, तर ते क्लेम नाकारू शकतात. तसेच, या आजारांसाठीचा ‘वेटिंग पीरिएड’ किती आहे, हे तपासून घ्या.

Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'

कमी प्रीमिअमच्या मोहात पडू नका : कमी प्रीमिअम असलेल्या पॉलिसीमध्ये सुविधाही कमी असू शकतात. केवळ स्वस्त आहे म्हणून पॉलिसी निवडण्यापेक्षा, त्यामध्ये मिळणारे कव्हरेज किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. आजारपणात हॉस्पिटलचा खर्च लाखांच्या घरात जातो, अशा वेळी कमी ‘सम इन्शुअर्ड’ असलेली पॉलिसी आर्थिकदृष्ट्या तोट्याची ठरू शकते.

‘को-पेमेंट’ क्लॉज नीट समजून घ्या : विमा योजनांमध्ये ‘को-पेमेंट’ची अट असते. यात खर्चातील ठरावीक हिस्सा विमाधारकाला स्वतः भरावा लागतो. कमीत कमी को-पेमेंट असलेली योजना निवडा.

रूम रेंट आणि सब-लिमिट्स तपासा : अनेक विमा कंपन्या हॉस्पिटलच्या खोलीच्या भाड्यावर मर्यादा घालतात. तसेच विशिष्ट शस्त्रक्रियांवर असणारी मर्यादा आधीच तपासावी.

हॉस्पिटल नेटवर्क आहे का? : आणीबाणीच्या प्रसंगी ‘कॅशलेस’ उपचार मिळणे आवश्यक असते. तुम्ही घेतलेल्या विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये तुमच्या भागातील नामांकित रुग्णालये आहेत का, याची खात्री करा.

Web Title : माता-पिता के लिए बीमा खरीद रहे हैं? अधिकतम लाभ के लिए इन गलतियों से बचें।

Web Summary : वरिष्ठ नागरिकों के लिए स्वास्थ्य बीमा महत्वपूर्ण है। पहले से मौजूद बीमारियों को न छुपाएं। पर्याप्त कवरेज, कम सह-भुगतान वाली पॉलिसी चुनें और कमरे के किराए की सीमा जांचें। सुनिश्चित करें कि नेटवर्क अस्पताल आपात स्थिति के दौरान बिना नकद के उपचार प्रदान करते हैं।

Web Title : Buying insurance for parents? Avoid these mistakes for maximum benefit.

Web Summary : Health insurance is vital for seniors. Don't hide pre-existing conditions. Choose policies with adequate coverage, low co-payment, and check room rent limits. Ensure network hospitals offer cashless treatment during emergencies to avoid financial strain.