lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger Stock: 35 पैशांच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी

Multibagger Stock: 35 पैशांच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी

Multibagger Stock: हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर फक्त 35 पैसे होता, जो आता वाढून 281 रुपये झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 04:09 PM2022-02-27T16:09:47+5:302022-02-27T16:10:09+5:30

Multibagger Stock: हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर फक्त 35 पैसे होता, जो आता वाढून 281 रुपये झाला आहे.

Share Market | Stock Market | Multibagger Stock | Penny Share | 35 paise per share gave bumper returns, 1 lakh in 6 months became 8 crore | Multibagger Stock: 35 पैशांच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी

Multibagger Stock: 35 पैशांच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी

मुंबई: बहुतेक पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना झटके देतात. पण काही पेनी स्टॉक्स असेही आहेत, जे गुंतवणूकदारांना छप्पडफाड कमाई करुन देतात. काही हजारांची गुंतवणूक अन् काही महिन्यांतच लाखोंची होते. परंतु असे पेनी स्टॉक शोधणे सर्वात कठीण आहे.

आम्ही तुम्हाला आज अशाच एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या 6 महिन्यांत बंपर रिटर्न्स दिले. SEL Manufacturing Company Ltd असे या स्टॉकचे नाव आहे. हा पेनी स्टॉक गेल्या 6 महिन्यांत मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने 6 महिन्यांत 80,000 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. 

आजपासून 6 महिन्यांपूर्वी सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा हा स्टॉक केवळ 35 पैशांचा होता. पण, हा स्टॉक इतक्या लवकर  गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देईल, असा कुणी विचारदेखील केला नव्हता. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा स्टॉक 6 महिन्यांत 35 पैशांवरुन 281 रुपयांपर्यंत वाढला आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर फक्त 35 पैसे होता, जो आता वाढून 281 रुपये झाला आहे. 

1 लाख 8 कोटी गुंतवणूकदार झाले
तुम्ही या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर-2021 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ती रक्कम 8 कोटी रुपये झाली असती. तर या शेअरमध्ये 6 महिन्यांपूर्वी फक्त 1000 रुपये गुंतवले असते तर ती गुंतवणूक 8 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. गेल्या एका महिन्यातच या शेअरने 177.81 टक्के परतावा दिला आहे. 

(टीप: आम्ही तुम्हाला फक्त माहिती देत आहोत, कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Share Market | Stock Market | Multibagger Stock | Penny Share | 35 paise per share gave bumper returns, 1 lakh in 6 months became 8 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.