lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात 'बोंबाबोंब'; 10 वर्षांतील ऐतिहासिक घसरणीने खळबळ

शेअर बाजारात 'बोंबाबोंब'; 10 वर्षांतील ऐतिहासिक घसरणीने खळबळ

शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गेल्या 10 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर गाठला असून, त्यामुळे शेअर बाजार गडगडला आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम सातत्यानं अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 02:25 PM2020-03-09T14:25:31+5:302020-03-09T14:29:32+5:30

शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गेल्या 10 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर गाठला असून, त्यामुळे शेअर बाजार गडगडला आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम सातत्यानं अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होत आहे.

Sensex at 35,234.60; down by 2342.02 points, A historical decline of 10 years vrd | शेअर बाजारात 'बोंबाबोंब'; 10 वर्षांतील ऐतिहासिक घसरणीने खळबळ

शेअर बाजारात 'बोंबाबोंब'; 10 वर्षांतील ऐतिहासिक घसरणीने खळबळ

Highlightsकोरोना अन् YES बँकेच्या संकटानं शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण झाली असून, निर्देशांक 2450 अंकांनी कोसळला आहे.शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गेल्या 10 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर गाठला असून, त्यामुळे शेअर बाजार गडगडला आहे. ओएनजीसी, आरआयएल, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर येस बँकेच्या समभागात तेजी आल्याचं पाहायला मिळालं. 

मुंबईः कोरोना अन् YES बँकेच्या संकटानं शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण झाली असून, निर्देशांक 2450 अंकांनी कोसळला आहे. निफ्टीतही जवळपास 600 अंकांची घट नोंदवली गेली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गेल्या 10 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर गाठला असून, त्यामुळे शेअर बाजार गडगडला आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम सातत्यानं अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होत आहे.ओएनजीसी, आरआयएल, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर येस बँकेच्या समभागात तेजी आल्याचं पाहायला मिळालं.  सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1700 अंकांनी कोसळला, तर निफ्टीसुद्धा 10,600च्या नीचांकी स्तरावर आला होता. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 5.70 लाख कोटींहून अधिक पैसे बुडाले आहेत. सोमवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील समभागांचे एकूण कंपन्यांचं भाग भांडवल 1,44,31,224.41 कोटी रुपये होते, जे सोमवारी बाजारात झालेल्या घसरणीनंतर 5,68,393.48 कोटी रुपयांनी घसरून 1,38,62,830.93 कोटी रुपयांवर आलं होतं. 

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभही निराशेनेच झाला होता. सप्ताहामधील एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता बाजार सातत्याने खालीच जाताना दिसून आला. बाजारातील विक्रीच्या प्रचंड दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला अनुक्रमे 38 हजार आणि 11 हजार अंशांची पातळी राखता आली नाही. शेअर बाजाराच्या सोमवारच्या घसरणीला कोरोना व्हायरस आणि रशिया-सौदी अरेबियात भडकलेलं तेलयुद्ध या घसरणीला कारणीभूत असल्याचे मानले जाते आहे. अमेरिका शिंकते, तेव्हा जगाला सर्दी झाल्यासारखे वाटू लागते, असे म्हटले जाते. कोरोनचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.


डाऊचा निर्देशांक 750 अंकांनी सुधारून बंद झाला. तर शुक्रवारी एसएंडपी 500 आणि नॅस्डॅक जवळपास 2 टक्क्यांनी घसरले होते.  जगातील अव्वल क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा जोरदार फटका बसणार असल्याचे मानले जाऊ लागले. त्याचे पडसाद जगभर उमटले. कोरोनामुळे परिस्थिती सुधारत नसल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झालेली दिसून आली होती. या घसरणीमुळे अनेक समभाग खूप खाली आले. स्मॉलकॅपच्या 159 समभागांचे दर 10 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान घसरलेले दिसून आले. त्यामानाने मिडकॅपला घसरणीचा बसलेला फटका कमी होता.

Web Title: Sensex at 35,234.60; down by 2342.02 points, A historical decline of 10 years vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.