lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दरमहा 3300 रुपये वाचवा आणि निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी रुपये, जाणून घ्या कसे...

दरमहा 3300 रुपये वाचवा आणि निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी रुपये, जाणून घ्या कसे...

आर्थिक सल्लेगार सांगतात की, उत्पन्न कमी असले तरी उत्पन्नातील किमान 20% नियमितपणे वाचवले पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 11:15 AM2021-12-03T11:15:43+5:302021-12-03T11:16:15+5:30

आर्थिक सल्लेगार सांगतात की, उत्पन्न कमी असले तरी उत्पन्नातील किमान 20% नियमितपणे वाचवले पाहिजे.

Save Rs 3300 per month and get Rs 9 crore after retirement, find out how | दरमहा 3300 रुपये वाचवा आणि निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी रुपये, जाणून घ्या कसे...

दरमहा 3300 रुपये वाचवा आणि निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी रुपये, जाणून घ्या कसे...

नवी दिल्ली: बर्‍याचदा असं दिसून आलंय की, जे लोक बचत करुनही वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा कमी कमावतात, ते कलम 80C अंतर्गत त्यांच्या कर बचत गुंतवणुकीची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करतात. वर्षाच्या शेवटी ते त्यांचे PPF खाते सक्रिय ठेवून विम्याचे प्रीमियम भरण्यासाठी पैशासाठी धावपळ करत राहतात. असे घडते कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना पैसे वाचवण्याची शिस्त नसते. भाडे, वीज, वाहतूक, दूरसंचार आणि जीवनशैलीचा खर्च यासारख्या अत्यावश्यक खर्चांची पूर्तता केल्यानंतर ते नेहमी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात.

उत्पन्नातून 20% वाचवा
आर्थिक सल्लेगार सांगतात की, तरुणांनी त्यांचे उत्पन्न कमी असताना त्यांची विचारसरणी बदलण्याची गरज आहे. या लोकांसाठी खर्च करण्यापूर्वी बचत करणे महत्वाचे आहे. आधी बचत करावी आणि त्यानंतरच खर्च करावा. तुम्ही तुमच्या उत्पन्नातील 20% नियमितपणे वाचवले पाहिजे. हे करण्यासाठी तुमच्या पगार खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस(ECS) करा, जे तुमच्या घरी घेऊन जाणाऱ्या पगाराच्या 20 टक्के त्याच बँकेत 1 वर्षाच्या आवर्ती ठेव (RD) मध्ये हस्तांतरित करेल आणि उर्वरित 80 टक्क्यात तुमचा खर्च भागवा.

अशी गुंतवणूक करा
एक वर्षाची आरडी पूर्ण केल्यानंतर ती रक्कम तुमच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम भरण्यासाठी वापरा. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) मध्ये बचत करा जेणेकरून तुम्हाला कलम 80C अंतर्गत करात लाभ मिळू शकेल. तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल पण दीर्घकाळात तुम्हाला या खर्चाच्या पद्धतीची सवय होईल आणि बचतीची शिस्त लागेल. बचत आपोआप होणार नाही, महागड्या वस्तू, अनावश्यक खर्च टाळून बचत करावी लागेल. 

ELSS योजनांमध्ये करा गुंतवणूक
तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांत PPF च्या तुलनेत ELSS योजनांमध्ये जास्त रक्कम भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळात चक्रवाढीचा लाभ मिळू शकेल. ELSS योजना 20-30 वर्षांच्या कालावधीत 12-15 टक्क्यांदरम्यान चक्रवाढ परतावा देऊ शकते, तर PPF 7-8 टक्क्यांपेक्षा जास्त देऊ शकत नाही. वेल्थ मॅनेजर्स सांगतात की, तुम्ही पीपीएफ मधून मिळणार्‍या रिटर्न्सचे स्वरुप लक्षात घेतले, तर ELSS योजनांमधून मिळणारा परतावा नेहमीच PPF पेक्षा जास्त असेल.

निवृत्तीनंतर मिळवा 9 कोटी

जर तुम्ही एसआयपीद्वारे ELSS फंडात दरमहा रु. 3,000 गुंतवायला सुरुवात केली, तर तुम्ही निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळवू शकता.समजा तुम्ही 25 वर्षांचे असाल आणि ELSS स्कीममध्ये रु. 3,172 चा SIP सुरू केला आणि तुमच्या पगारात दरवर्षी ही SIP रक्कम 10% ने वाढवली, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 12% रिटर्नसह तुम्ही 5 कोटी रुपये मिळवू शकता. तसेच, तुम्ही रिटर्न्स दरमहा 3,306 रुपयांच्या एसआयपी सुरू कराल आणि 60 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी 10 टक्क्यांनी वाढवाल, तर तुम्ही निवृत्तीपर्यंत 9 कोटी रुपये कमवू शकता.

Web Title: Save Rs 3300 per month and get Rs 9 crore after retirement, find out how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.