lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेलयुद्ध भडकणार? रशियाने धुडकावले निर्बंध; पुरवठा राेखण्याचा दिला इशारा

तेलयुद्ध भडकणार? रशियाने धुडकावले निर्बंध; पुरवठा राेखण्याचा दिला इशारा

पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. युराेपमधील अनेक देश रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 10:13 AM2022-12-05T10:13:32+5:302022-12-05T10:13:53+5:30

पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. युराेपमधील अनेक देश रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत

Russia has rejected crude oil Price demand by European Union and the G-7 organization | तेलयुद्ध भडकणार? रशियाने धुडकावले निर्बंध; पुरवठा राेखण्याचा दिला इशारा

तेलयुद्ध भडकणार? रशियाने धुडकावले निर्बंध; पुरवठा राेखण्याचा दिला इशारा

नवी दिल्ली : युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या हाेत्या. आता रशियाच्या कच्च्या तेलासाठी ६० डाॅलर्स प्रति बॅरल एवढी किंमत युराेपियन युनियन आणि जी-७ संघटनेने निश्चित केली आहे. मात्र, रशियाने ती मागणी धुडकावली आहे. उलट त्या देशांचा पुरवठा राेखण्याचा इशाराही रशियाने दिला आहे. त्यामुळे तेलयुद्ध नव्याने भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. युराेपमधील अनेक देश रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत. मात्र, आता त्यासाठी पाश्चिमात्य देशांनी ६० डाॅलर्स प्रति बॅरल एवढी किंमत निश्चित केली आहे. ही किंमत साेमवार पाच डिसेंबरपासून लागू हाेणे अपेक्षित आहे. रशियाने मात्र त्यांना धुडकावून लागले आहे. अशा प्रकारे किमती निश्चित करणे आम्हाला मान्य नाही. असे रशियाने म्हटले आहे.

तेल उत्पादन किती करावे? ओपेकला साशंकता 

ओपेकने नाेव्हेंबरमध्ये दरराेज ७ लाख बॅरल्स एवढे उत्पादन घटविले आहे, तर त्या तुलनेत रशियाने तेल उत्पादन वाढविले आहे. निर्बंधामुळे उत्पाद किती करावे, याबाबत ओपेक देश साशंक आहेत.

युक्रेनने रशियन कच्च्या तेलाची किंमत फक्त ३० डाॅलर्स प्रति बॅरल एवढी ठेवण्याची आक्रमक मागणी केली आहे. त्यामुळे शत्रूची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त हाेईल, अशी युक्रेनची भूमिका आहे.

रशियाचा इशारा
तेलाची किंमत निश्चित करण्यावरून रशियाने पाश्चिमात्य देशांना इशारा दिला आहे. निर्बंधाचे समर्थन करणाऱ्या देशांचा तेलपुरवठा थांबविण्यात येईल, अशी धमकी रशियाने दिली आहे. रशियाच्या पावित्र्यामुळे तेलयुद्ध भडकू शकते.

दरांमध्ये घसरण
भारताला आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत सुमारे २० डाॅलर्स प्रति बॅरल कमी किमतीने रशिया तेल विकत आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपानसह २७ देशांचे किमतीवरील निर्बंधांना समर्थन आहे. बाजारात रशियाच्या एन्ट्रीनंतर कच्च्या तेलाचे दर 
१० महिन्यांतील नीचांकीवर आले आहेत. 

Web Title: Russia has rejected crude oil Price demand by European Union and the G-7 organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.