lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स-Disney मर्जरची घोषणा, नीता अंबानी सांभाळणार नव्या कंपनीची धुरा; जाणून घ्या संपूर्ण डिटेल

रिलायन्स-Disney मर्जरची घोषणा, नीता अंबानी सांभाळणार नव्या कंपनीची धुरा; जाणून घ्या संपूर्ण डिटेल

70 हजार कोटी रुपयांची आहे ही डील...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:38 PM2024-02-28T21:38:21+5:302024-02-28T21:39:15+5:30

70 हजार कोटी रुपयांची आहे ही डील...!

Reliance-Disney merger announced, Nita Ambani to lead new company Know about details | रिलायन्स-Disney मर्जरची घोषणा, नीता अंबानी सांभाळणार नव्या कंपनीची धुरा; जाणून घ्या संपूर्ण डिटेल

रिलायन्स-Disney मर्जरची घोषणा, नीता अंबानी सांभाळणार नव्या कंपनीची धुरा; जाणून घ्या संपूर्ण डिटेल

भारतातील वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया ऑपरेशन्सचे विलीनीकरण झाले आहेत. निवेदनानुसार, या करारांतर्गत, रिलायन्स दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या संस्थेत तब्बल 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांनी एका बंधनकारक करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टॉक एक्सचेन्जला या विलिनीकरणासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, या विलिनीकरणाच्या प्रक्रियेतील महत्वाचा स्टेक होल्डर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. तर डिस्नेची हिस्सेदारी 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. महत्वाचे म्हणजे, ही डील 70 हजार कोटी रुपयांची आहे.

कुणीची किती हिस्सेदारी - 
रिलायन्स इंडस्ट्रीज, Viacom18 आणि डिस्ने यांची या नव्या संस्थेत अनुक्रमे 16.34%, 46.82% आणि 36.84% एवढी हिस्सेदारी असेल. Viacom18 ही रिलायन्सचीच सब्सिडरी कंपनी आहे. यामुळे रिलायन्सकडे नव्या कंपनीत एकूण 63.16 टक्के एवढी हिस्सेदारी असेल. आता विविध नियामकांच्या मंजुरीनंतर हे विलीनीकरण अधिक प्रभावी होईल.

ओटीटीवर असेल फोकस -
रिलायन्सने ओटीटी उद्योग वाढविण्यासाठी जॉइंट व्हेंचरमध्ये जवळपास 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यावरही सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात रिलायन्सने म्हटले आहे की, आम्ही भारतात मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या डिजिटल बदलाचे नेतृत्व करू आणि ग्राहकांना कधीही आणि कुठेही हाई क्वालिटी आणि अधिकाधिक कंटेट पुरवू. या नव्या कंपनीला 30,000 हून अधिक डिस्ने कंटेंट अॅसेटच्या लायसन्स सोबतच भारतात डिस्ने फिल्म्सचे डिस्ट्रिब्यूशनचा अधिकारही मिळेल.
 

Web Title: Reliance-Disney merger announced, Nita Ambani to lead new company Know about details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.