lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी

Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज पार पडणार आहे. यामध्ये मुकेश अंबानी मोठ्या घोषणा करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:43 AM2023-08-28T10:43:27+5:302023-08-28T10:43:50+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज पार पडणार आहे. यामध्ये मुकेश अंबानी मोठ्या घोषणा करू शकतात.

Reliance AGM 2023 Gift to investors before Diwali Mukesh Ambani can make 5 big announcements jio retail jio financial ipo new energy | Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी

Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज पार पडणार आहे. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी एजीएममध्ये अनेकदा मोठ्या घोषणा करतात. यावेळीही शेअर बाजार आणि रिलायन्समधील ३६ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. रिलायन्सचा शेअर गेल्या काही काळापासून मर्यादित टप्प्यात व्यवहार करत आहे. एजीएममध्ये काही मोठ्या घोषणांमुळे पुन्हा हा शेअर स्पीड पकडू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. रिलायन्सची एजीएम आज दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. पाहूया यामध्ये कोणत्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

आयपीओ
रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायाच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील एजीएममध्ये जिओ आणि रिटेलच्या आयपीओबद्दल अपडेट देणार असल्याचं अंबानींनी यापूर्वीच्या एजीएममध्ये म्हटलं होतं. गुगल, जनरल अटलांटिक, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि मेटा प्लॅटफॉर्मने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचप्रमाणे कतार गुंतवणूक प्राधिकरण, केकेआर, सिल्व्हर लेक पार्टनर्स आणि सौदी अरेबिया आणि सिंगापूरच्या सार्वभौम संपत्ती फंडांनी रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं गेल्या आठवड्यात लिस्टिंग झालं आहे. एजीएममध्ये, मुकेश अंबानी याच्या पुढील रोडमॅपबद्दल माहिती देऊ शकतात. कंपनीनं ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या असेट्स मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्यानं म्युच्युअल फंड कंपनी सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुरूवातीला ३० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनी कन्झ्युमर आणि मर्चेंट लेंडिंगमध्येही जाऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काही गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवला तर, कंपनी विमा क्षेत्रातही काही करू शकते. कंपनी आधीच विमा ब्रोकिंग व्यवसायात आहे आणि तिचे १७ पेक्षा जास्त विमा भागीदार आहेत.

5G, जियो फायबर
रिलायन्सनं आपल्या वार्षिक अहवालात डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात 5G रोलआउट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. याबाबत अंबानी अनेक अपडेट्स देऊ शकतात. यासोबतच 5G प्रीपेड प्लॅनबद्दलही अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. यासोबतच Jio Bharat 4G फोन सारखा Jio 5G स्मार्टफोन आणण्याची कंपनीची योजना आहे का याचीही प्रतीक्षा आहे. गेल्या एजीएममध्ये कंपनीने JioAirFiber लाँच करण्याची घोषणा केली होती. हे वायरशिवाय 5G स्पीड देईल. अंबानी एजीएममध्ये लॉन्चची तारीख जाहीर करू शकतात.

न्यू एनर्जी
रिलायन्सनं २०३५ पर्यंत कार्बन झिरो बनण्यासाठी पुढील तीन वर्षांत न्यू एनर्जी (रिन्यूएबल एनर्जी) व्यवसायात १० अब्ज गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याबाबत अंबानी अपडेट देऊ शकतात. यासोबतच तो संबंधित प्रकल्प सुरू होण्याची तारीख जाहीर करू शकतात. परदेशी ब्रोकिंग फर्म बर्नस्टीनच्या मते, रिलायन्स २०३० पर्यंत आपल्या न्यू एनर्जी व्यवसायातून १० ते १५ अब्ज डॉलर्सची कमाई करू शकते. भविष्यात, हे कंपनीसाठी ग्रोथ इंजिनही बनू शकतं.

रिलायन्स रिटेलचा विस्तार
रिलायन्स रिटेलनं विविध कन्झुमर सेगमेंटमध्ये विस्तार केला आहे. कंपनीनं आपला FMCG ब्रँड 'Independence' उत्तर भारतातही लॉन्च केलाय. येत्या काही दिवसांत, आरआरव्हीएल ई-कॉमर्समध्ये आपली उपस्थिती मजबूत करू शकते. कंपनी सप्लाय चेन मजबूत करू शकते आणि अधिग्रहणांवर लक्ष केंद्रित करू शकते. कंपनीच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकतात.

Web Title: Reliance AGM 2023 Gift to investors before Diwali Mukesh Ambani can make 5 big announcements jio retail jio financial ipo new energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.