lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC बँकेला दणका! RBI ने ठोठावला १० कोटींचा दंड; नेमके कारण काय? 

HDFC बँकेला दणका! RBI ने ठोठावला १० कोटींचा दंड; नेमके कारण काय? 

देशातील सर्वांत मोठी खासगी बँक म्हणून ओळख असलेल्या HDFC बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तब्बल १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:58 PM2021-05-29T16:58:23+5:302021-05-29T16:59:12+5:30

देशातील सर्वांत मोठी खासगी बँक म्हणून ओळख असलेल्या HDFC बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तब्बल १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

rbi imposes penalty of rupees 10 Crore on hdfc bank in car loan case | HDFC बँकेला दणका! RBI ने ठोठावला १० कोटींचा दंड; नेमके कारण काय? 

HDFC बँकेला दणका! RBI ने ठोठावला १० कोटींचा दंड; नेमके कारण काय? 

नवी दिल्ली: देशातील सर्वांत मोठी खासगी बँक म्हणून ओळख असलेल्या HDFC बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तब्बल १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियामक टप्प्यातील कमतरता आणि बँकेने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता यावर स्थिती स्पष्ट न केल्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. (rbi imposes penalty of rupees 10 Crore on hdfc bank in car loan case)

HDFC बँकेच्या वाहन कर्ज पोर्टफोलिओमध्ये काहीतरी गडबड झाल्याबद्दल एका व्हिसलब्लोअरने रिझर्व्ह बँकेकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर रिझर्व्ह बॅंकेकडून थर्ड पार्टी नॉन फाइनेंशियल प्रोडक्ट्स-आर्थिक उत्पादनांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासात काही त्रुटी आढळल्या. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले. 

फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

HDFC बँकेला RBI ने ठोठावला १० कोटींचा दंड

रिझर्व्ह बँकेने बजावलेल्या नोटिसीला एचडीएफसी बँकेकडून उत्तर देण्यात आले. मात्र, या उत्तरावर रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले नाही. यामुळे शेवटी तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्याने HDFC बँकेला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एका अहवालानुसार, बँक ग्राहकांना वाहन कर्ज मंजूर करताना पारदर्शक व्यवहार करत नव्हती.

केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय

दरम्यान, देशातील सर्वात मोठी खासगी बँक वाहन कर्जाशी संबंधित नियमांचे पालन करीत नाही, असे दिसून आल्याचे सांगितले जात आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ६(२) आणि कलम ८ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे HDFC बँकेला हा दंड ठोठावल्याचे सांगितले जात आहे.   
 

Web Title: rbi imposes penalty of rupees 10 Crore on hdfc bank in car loan case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.