lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ration Card : तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर 'या' नंबरवर त्वरित करा तक्रार

Ration Card : तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर 'या' नंबरवर त्वरित करा तक्रार

Ration Card : सरकारने भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक (Helpline number) जारी केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 11:37 AM2021-11-07T11:37:13+5:302021-11-07T11:39:26+5:30

Ration Card : सरकारने भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक (Helpline number) जारी केले आहेत.

Ration complaint number, registration, toll free helpline: Are you being cheated by the dealer? DO THIS | Ration Card : तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर 'या' नंबरवर त्वरित करा तक्रार

Ration Card : तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर 'या' नंबरवर त्वरित करा तक्रार

नवी दिल्ली : रेशन कार्ड (Ration Card) हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. रेशन कार्डच्या माध्यमातूनच सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबीयांना रेशन पुरवते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की, डीलर्स किंवा रेशन दुकानदार हे रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात. असे काही तुमच्या बाबतीत घडले तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. 

सरकारने भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक (Helpline number) जारी केले आहेत. सरकारने रेशन कार्डधारकांसाठी राज्य निहाय हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव देखील जोडू शकता.

राज्य निहाय तक्रार हेल्पलाइन नंबर खालील प्रमाणे...
आंध्र प्रदेश – 1800-425-2977
अरुणाचल प्रदेश – 03602244290
आसाम - 1800-345-3611
बिहार- 1800-3456-194
छत्तीसगड- 1800-233-3663
गोवा- 1800-233-0022
गुजरात- 1800-233-5500
हरियाणा – 1800-180-2087
हिमाचल प्रदेश – 1800-180-8026
झारखंड - 1800-345-6598, 1800-212-5512
कर्नाटक- 1800-425-9339
केरळ- 1800-425-1550
मध्य प्रदेश - 181
महाराष्ट्र- 1800-22-4950
मणिपूर- 1800-345-3821
मेघालय- 1800-345-3670
मिझोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891
नागालँड - 1800-345-3704, 1800-345-3705
ओडिशा - 1800-345-6724 / 6760
पंजाब – 1800-3006-1313
राजस्थान – 1800-180-6127
सिक्कीम – 1800-345-3236
तामिळनाडू – 1800-425-5901
तेलंगणा – 1800-4250-0333
त्रिपुरा- 1800-345-3665
उत्तर प्रदेश- 1800-180-0150
उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188
पश्चिम बंगाल – 1800-345-5505
दिल्ली – 1800-110-841
जम्मू – 1800-180-7106
काश्मीर – 1800-180-7011
अंदमान आणि निकोबार बेटे – 1800-343-3197
चंदीगड – 1800-180-2068
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - 1800-233-4004
लक्षद्वीप – 1800-425-3186
पुडुचेरी - 1800-425-1082

या लिंकला भेट द्या...
आपल्या राज्याचा टोल फ्री नंबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या  https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर भेट देऊन काढू शकता. याचबरोबर, अनेकदा असे दिसून येते की, रेशनकार्डसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने रेशन कार्ड मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, लोक याद्वारे सहजपणे त्याची तक्रार देखील करू शकतो. 

अशा प्रकारे बनवता येते रेशन कार्ड...
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संबंधित राज्याच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. रेशनकार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात. जर हे कार्ड नसेल तर सरकारने दिलेले कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येते. रेशनकार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला पाच ते 45 रुपये द्यावे लागतील. अर्ज सादर केल्यानंतर, तो फील्ड सत्यापनासाठी पाठविला जातो. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची पडताळणी करतो.

Web Title: Ration complaint number, registration, toll free helpline: Are you being cheated by the dealer? DO THIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.