lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > लोकसंख्या हे सर्वात मोठे भांडवल, नीट वापर करण्यात भारत अपयशी; रोजगार निर्मितीवर भर हवा

लोकसंख्या हे सर्वात मोठे भांडवल, नीट वापर करण्यात भारत अपयशी; रोजगार निर्मितीवर भर हवा

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:19 AM2024-04-18T06:19:46+5:302024-04-18T06:21:54+5:30

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत.

raghuram rajan said, Population is the biggest capital, India fails to utilize properly | लोकसंख्या हे सर्वात मोठे भांडवल, नीट वापर करण्यात भारत अपयशी; रोजगार निर्मितीवर भर हवा

लोकसंख्या हे सर्वात मोठे भांडवल, नीट वापर करण्यात भारत अपयशी; रोजगार निर्मितीवर भर हवा

वॉशिंग्टन : भारताची लोकसंख्या सध्या जगात सर्वाधिक आहे. परंतु या ताकदीचा नीटपणे वापर करण्यात भारत अपयशी ठरला आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. सर्वाधिक लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा भारताला करून घेता आला नाही, असे ते वॉशिंग्टनमध्ये म्हणाले. 

जादा लोकसंख्येमुळे कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे. यामुळे उत्पादनांचे प्रमाण वाढवून वेगाने आर्थिक प्रगती साधणे शक्य आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. येथील जॉर्ज वॉशिंग्टन विश्वविद्यालयात '२०४७ पर्यंत भारताला प्रगत अर्थव्यवस्था बनविण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या' या विषयावर आयोजित परिसंवादात रघुराम राजन यांनी भाग घेतला. त्यावेळी राजन  बोलत होते.  

भारताची अर्थव्यवस्था सध्या ६ टक्क्यांनी वाढत आहे. सध्याच्या  लोकसंख्येच्या विचार केला असता देशाला केवळ ६ टक्के दराने वृद्धी करणे शक्य झाल्याचे दिसते. परंतु हा वृद्धिदर कमी आहे. चीन, कोरिया या देशांनी लोकसंख्येच्या ताकदीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घेतला आहे. या देशांना लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा योग्य लाभ मिळाला आहे.     - रघुराम राजन, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

बेरोजगारीत सातत्याने वाढ
- चिप निर्मीतीसारख्या क्षेत्राला दिलेल्या अनुदानावरही टीका करताना ते म्हणाले की, चिप निर्माण करणाऱ्या कारखान्यांचा विचार करा. या कामासाठी कारखान्यांचा आता अब्जावधी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. 
- मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या चामडा उद्योगाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे देशात रोजगारांची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. गेल्या १० वर्षांत रोजगार निर्माण झाला नाही असे नाही, तर गेल्या काही दशकांपासून बेरोजगारी वाढत आहे.

उद्योगांची उपेक्षा होऊ नये
मोठ्या प्रमाणावर रोजगारांची निर्माण होण्याची शक्यता असते त्या उद्योगांची कायम उपेक्षा झाली आहे. या निमित्ताने चुका नेमक्या कुठे होत आहेत, हे लक्षात येते. त्यानुसार त्या क्षेत्रांकडे अधिक लक्ष देत आपल्याला सुधारणा कराव्या लागणार आहेत, असेही राजन म्हणाले. 

Web Title: raghuram rajan said, Population is the biggest capital, India fails to utilize properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.