lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४५ लाखांपेक्षा कमी दर? ग्राहकांना नको स्वस्त घरं, मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत २२ टक्के घट

४५ लाखांपेक्षा कमी दर? ग्राहकांना नको स्वस्त घरं, मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत २२ टक्के घट

४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये २२ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:07 AM2024-04-15T10:07:13+5:302024-04-15T10:07:37+5:30

४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये २२ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

property Rates less than 45 lakhs Consumers don t want affordable homes sales down 22 percent from last year | ४५ लाखांपेक्षा कमी दर? ग्राहकांना नको स्वस्त घरं, मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत २२ टक्के घट

४५ लाखांपेक्षा कमी दर? ग्राहकांना नको स्वस्त घरं, मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत २२ टक्के घट

देशातील आठ प्रमुुख शहरांमध्ये २०२४ च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत घरांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये २२ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. घरांची विक्री करणाऱ्या प्रॉपटाइगर.कॉम या कंपनीने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
 

मागील वर्षी याच समान कालावधीत एकूण झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये परवडणाऱ्या घरांचा वाटा ४८ टक्के इतका होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या कालखंडात एकूण १,२०,६४० घरांची  विक्री झाली. मागील वर्षी याच समान कालावधीत एकूण ८५,८४० घरांची विक्री करण्यात आली होती. एकूण विक्रीमध्ये ४१ टक्के इतकी वाढ झाली आहे. 
 

२५ लाखांपेक्षा स्वस्त घरांच्या मागणीत घट
 

  • जानेवारी ते मार्च या काळात विकल्या गेलेल्या एकूण घरांमध्ये किंमत २५ लाखांपेक्षा कमी असलेल्या घरांचे प्रमाण केवळ ५ टक्के इतके होते. 
  • चालू वर्षात जानेवारी ते मार्च या काळात २५ ते ४५ लाखदरम्यान किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १७ टक्के इतके होते. मागील वर्षी याच समान कालावधीत या श्रेणीतील घरांचा वाटा एकूण विक्रीमध्ये २३ टक्के इतका होता.

Web Title: property Rates less than 45 lakhs Consumers don t want affordable homes sales down 22 percent from last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.