lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB Scam : पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेला २६८ कोटींचा गंडा; बँकेची युके कोर्टात धाव 

PNB Scam : पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेला २६८ कोटींचा गंडा; बँकेची युके कोर्टात धाव 

एसईपीएल, पेस्को बीम यूएसए, थ्राईश विंड आणि थ्राईश रिसोर्सेस अशी या चार कंपन्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे यातील एसईपीएल या कंपनीवर बँक ऑफ बडोदाचंही कर्ज असल्याचं पीएनबीने आपल्या आरोपात स्पष्ट केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 02:07 PM2018-11-10T14:07:36+5:302018-11-10T14:08:33+5:30

एसईपीएल, पेस्को बीम यूएसए, थ्राईश विंड आणि थ्राईश रिसोर्सेस अशी या चार कंपन्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे यातील एसईपीएल या कंपनीवर बँक ऑफ बडोदाचंही कर्ज असल्याचं पीएनबीने आपल्या आरोपात स्पष्ट केलं आहे.

PNB Scam: Against Punjab National Bank Rs 268 Crore; Bank runs in UK court | PNB Scam : पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेला २६८ कोटींचा गंडा; बँकेची युके कोर्टात धाव 

PNB Scam : पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेला २६८ कोटींचा गंडा; बँकेची युके कोर्टात धाव 

Highlightsबँकेच्या लंडन येथील शाखेला तब्बल 37 मिलियन डॉलर म्हणजे 268 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाघोटाळा करणाऱ्यांमध्ये 5 भारतीय कंपन्या सामील आहेतहे कर्ज 2011 ते 2014 या दरम्यान या कंपन्यांनी मिळविले आहे

नवी दिल्ली - 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचे साथीदार देशाबाहेर पसार झाले असतानाच आता पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) दुसऱ्या घोटाळ्याच्या कचाड्यात सापडली आहे. या बँकेच्या लंडन येथील शाखेला तब्बल 37 मिलियन डॉलर म्हणजे 268 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा घोटाळा करणाऱ्यांमध्ये 5 भारतीय कंपन्या सामील आहेत. कंपन्यांनी करारपत्रातील अटींचा भंग केल्याचा आरोपही पीएबीने केला आहे.

पीएनबीची सहाय्यक बँक असलेल्या पीएनबी इंटरनॅशनलच्या इंग्लंडमध्ये सात शाखा आहेत. या शाखांमधून आरोपी कंपन्यांनी खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज घेतल्याचा आरोप बँकेने केला आहे. यात पाच भारतीय कंपान्यांसह 1 अमेरिकन आणि 3 अन्य कंपन्यांचाही समावेश आहे. एसईपीएल, पेस्को बीम यूएसए, थ्राईश विंड आणि थ्राईश रिसोर्सेस अशी या चार कंपन्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे यातील एसईपीएल या कंपनीवर बँक ऑफ बडोदाचंही कर्ज असल्याचं पीएनबीने आपल्या आरोपात स्पष्ट केलं आहे.  हे कर्ज 2011 ते 2014 या दरम्यान या कंपन्यांनी मिळविले आहे. या प्रकरणी पीएनबी इंटरनॅशनलने युके कोर्टात धाव घेतली आहे. बँकेने दाखल केलेल्या आरोपपत्रात चार नोंदणीकृत कंपन्यांना बँकेने डॉलरच्या रुपात कर्ज दिलं होतं. या चारही कंपन्या उर्जा क्षेत्राशी संबंधित आहेत. 

Web Title: PNB Scam: Against Punjab National Bank Rs 268 Crore; Bank runs in UK court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.