Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Price : गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय?

Petrol-Diesel Price : गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय?

Petrol-Diesel Price : दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:32 AM2021-07-16T08:32:52+5:302021-07-16T08:33:44+5:30

Petrol-Diesel Price : दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. 

petrol diesel prices today 16 july delhi mumbai kolkata chennai check rates in your city | Petrol-Diesel Price : गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय?

Petrol-Diesel Price : गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोलच्या किमतीत 40 वेळा वाढ; जाणून घ्या, आजचे दर काय?

Petrol-Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे. देशभरात इंधनाच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटर वाढ झाली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. 

देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलच्या दराने पहिल्यांदाच शंभरी ओलांडली होती. तसेच गुरुवारी पेट्रोलच्या दरात वाढ होत, 107.54 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलची किंमत 97.45 रुपये इतकी आहे. 4 मेनंतर पेट्रोलच्या दरात 40 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 37 वेळा वाढ करण्यात आली. या दरम्यान दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 11.14 रुपये आणि डिझेलच्या किमती 9.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. 

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर : 

शहरे           पेट्रोल (प्रति लिटर)          डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली           101.54                               89.87
मुंबई             107.54                               97.45
बंगळुरू        104.94                              95.26
चंदीगढ         97.64                                89.50
लखनौ           98.63                                90.26
पाटना           103.91                               95.51
जयपूर          108.40                               99.02
हैदराबाद      105.52                               97.96
गुरुग्राम        99.17                                  99.02
गंगानगर       112.90                                103.15

दरम्यान, इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब या 15 राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांपेक्षा महाग झाले आहे. राजस्थान, ओडिशा आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

Web Title: petrol diesel prices today 16 july delhi mumbai kolkata chennai check rates in your city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.