Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price Today: नेपाळ, पाकिस्तानच्या तुलनेत सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय भारतात, पण केव्हापर्यंत? निवडणुकांनंतर दरवाढ होणार?

Petrol Diesel Price Today: नेपाळ, पाकिस्तानच्या तुलनेत सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय भारतात, पण केव्हापर्यंत? निवडणुकांनंतर दरवाढ होणार?

Petrol Diesel Rate Today: जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असताना भारतासाठी दिलासादायक चित्र आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल सर्वात स्वस्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:17 IST2026-04-23T11:14:07+5:302026-04-23T11:17:24+5:30

Petrol Diesel Rate Today: जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असताना भारतासाठी दिलासादायक चित्र आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल सर्वात स्वस्त आहे.

Petrol Diesel Price Today Petrol is the cheapest in India compared to Nepal and Pakistan but till when Will the price increase after the elections | Petrol Diesel Price Today: नेपाळ, पाकिस्तानच्या तुलनेत सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय भारतात, पण केव्हापर्यंत? निवडणुकांनंतर दरवाढ होणार?

Petrol Diesel Price Today: नेपाळ, पाकिस्तानच्या तुलनेत सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय भारतात, पण केव्हापर्यंत? निवडणुकांनंतर दरवाढ होणार?

Petrol Diesel Rate Today: जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असताना भारतासाठी दिलासादायक चित्र आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल सर्वात स्वस्त असून येथील सरासरी किंमत १०१ रुपये लिटर आहे. याउलट नेपाळमध्ये पेट्रोल १३७.१२ रुपये, बांगलादेशात १०६.८५ रुपये, म्यानमारमध्ये १४७.५४ रुपये आणि भूतानमध्ये १०२.७८ रुपये लिटर आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर १२३.०५ रुपये, चीनमध्ये १३१.१३ रुपये आणि श्रीलंकेत १३४.६० रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर हाँगकाँगमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग म्हणजे ३८७.२६ रुपये, तर इस्रायलमध्ये २५८.६० रुपये लिटर आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ

होर्मूज संकटामुळे ब्रेंट क्रूड वायदा १०२.५२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला असून यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ९३.४४ डॉलर प्रति बॅरल झालं आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकारने गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी १० रुपयांनी कमी केली होती. तरीही सरकारी कंपन्यांना सध्या प्रति लिटर पेट्रोलवर २५ रुपयांचं नुकसान सोसावं लागत आहे. तर डिझेलवरही कंपन्यांवर मोठा बोजा पडत आहे.

बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव

दिल्लीच्या तुलनेत कोलकातामध्ये इंधन महाग

दिल्लीच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलचे दर सुमारे १० रुपयांनी जास्त आहेत. आज दिल्लीत पेट्रोल ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०४.९९ रुपये आणि डिझेल ९१.८१ रुपये लिटरनं विकलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असल्याने सध्या तेथे पेट्रोल-डीझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, पेट्रोलचा दर १०३.५४ रुपयांवर स्थिर आहेत. तर दुसरीकडे डिझेलचेही दर ९०.०३ रुपयांवर स्थिर आहेत. 

निवडणुकीनंतर दरवाढीची शक्यता?

मॅक्वेरी ग्रुपच्या अहवालानुसार, कंपन्यांना पेट्रोलवर १८ रुपये आणि डिझेलवर ३५ रुपये प्रति लिटरचा तोटा होत आहे. या अहवालात असं नमूद करण्यात आलंय की, निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title : भारत में पड़ोसी देशों से सस्ता पेट्रोल, चुनाव के बाद बढ़ेंगे दाम?

Web Summary : भारत में पेट्रोल पड़ोसी देशों से सस्ता, लगभग ₹101/लीटर। सरकारी कंपनियों को नुकसान। चुनाव बाद दाम बढ़ने की आशंका है, रिपोर्ट के अनुसार।

Web Title : India's Cheapest Petrol Compared to Neighbors, But Price Hike Looming?

Web Summary : India has the cheapest petrol in the region, around ₹101/liter. State firms face losses. Post-election price hikes are possible, reports suggest.