lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात भाजपाला झुकतं माप दिल्याच्या आरोपावर फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण, केलं महत्त्वपूर्ण विधान

भारतात भाजपाला झुकतं माप दिल्याच्या आरोपावर फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण, केलं महत्त्वपूर्ण विधान

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 09:50 PM2020-08-21T21:50:08+5:302020-08-21T22:25:58+5:30

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता.

Our work is open and transparent! Facebook's explanation after the political controversy in India | भारतात भाजपाला झुकतं माप दिल्याच्या आरोपावर फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण, केलं महत्त्वपूर्ण विधान

भारतात भाजपाला झुकतं माप दिल्याच्या आरोपावर फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण, केलं महत्त्वपूर्ण विधान

नवी दिल्ली - फेसबुकच्या वॉलवरील द्वेषपूर्ण सामुग्रीवरून भारतात पेटलेल्या राजकीय वादानंतर आज फेसबूकने अशा सामुग्रीबाबतचे आपले स्पष्टीकरण दिले आहे. आमचा मंच हा खुला, पारदर्शक आणि पक्षपात विरहित आहे, असे फेसबूक इंडियाने स्पष्ट केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भारतातीलफेसबुक व्हॉट्स अ‍ॅपवर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता.
फेसबूक इंडियाचे उपाध्यक्ष महासंचालक अजित मोहन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये यााबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यात ते म्हणतात की, फेसबुक हा एक खुला आणि पारदर्शक मंच आहे. तसेच फेसबुक कुठलाही पक्ष आणि विचारसरणीचे समर्थन करत नाही. या प्लॅटफॉर्मवर लोक आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आपले धोरण लागू करण्यामध्ये पक्षपात केल्याचा आरोप झाला आहे. आम्ही या आरोपाकडे गांभीर्याने पाहत आहोत, तसेच आम्ही द्वेष आणि कट्टरता यांचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संसदेच्या स्थायी समितीमधील माहिती तंत्रज्ञान विभागाटे अध्यक्ष शशी थरूर यांनी फेसबुकच्या प्रतिनिधींना २ सप्टेंबर रोजी आपला पक्ष मांडण्यासाठी पाचारण केले आहे. त्यानंतर भाजपाने शशी थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. हा निर्णय घेताना थरूर यांनी इतर सदस्यांसोबत चर्चा केली नाही. तसेच थरून यांना एकट्याने कारवाई करण्याचा अधिकार नाही, असा आरोप समितीमधील सदस्य आणि भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी केला होता. तसेच थरून यांना हटवून कुठल्याही अन्य व्यक्तीला अध्यक्ष बनवण्याची मागणी केली होती. तर निशिकांत दुबे हे संसदेचा अपमान करत असल्याचा आरोप थरूर यांनी केला आहे.

Web Title: Our work is open and transparent! Facebook's explanation after the political controversy in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.