Lokmat Money > बिझनेस न्यूज > वृद्धीसाठी खुल्या बाजाराची गरज

वृद्धीसाठी खुल्या बाजाराची गरज

जागतिक पातळीवर संरक्षणवाद वाढत चालल्याबद्दल भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:14 AM2017-06-10T00:14:33+5:302017-06-10T00:14:33+5:30

जागतिक पातळीवर संरक्षणवाद वाढत चालल्याबद्दल भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Open Market Need for Growth | वृद्धीसाठी खुल्या बाजाराची गरज

वृद्धीसाठी खुल्या बाजाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर संरक्षणवाद वाढत चालल्याबद्दल भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारताला ८ ते १0 टक्के वृद्धीदर गाठण्यासाठी खुल्या बाजाराची गरज आहे, असे ते म्हणाले.
सुब्रमण्यन म्हणाले की, जागतिक पातळीवर बाजार खुला राहील, यासाठी भारताला आता महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे मला वाटते. या टप्प्यावर जागतिकीकरणापासून मागे हटणे हे आपल्यासाठी चिंताजनक ठरणार आहे. ८ ते १0 टक्के वृद्धी हवी असेल, तर खुल्या बाजाराची गरज आहे.
एका कार्यक्रमात सुब्रमण्यन म्हणाले की, जागतिकीकरण अथवा खुल्या बाजाराचा सर्वांत मोठा लाभ मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना मिळाला आहे. ही प्रक्रिया सुरू राहणे या देशांच्या हिताचे आहे. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर संरक्षणवादाला गती मिळाली आहे. त्यामुळे जागतिकीकरणाला धोका निर्माण झाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, ज्या देशांना अमेरिकेची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे, अशा देशांसोबतच्या व्यापारी करारांचा फेरआढावा घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले आहे.
चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि जर्मनी या देशांना अमेरिकेची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. त्यांच्या सोबतच्या करारांचा फेरविचार होऊ शकतो, असे संकेत यातून मिळतात. याशिवाय ब्रिटनने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Open Market Need for Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.