lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > संपूर्ण फॅमिलीसाठी एकच प्लॅन, 300GB डेटा, प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारही; किंमतही कमी

संपूर्ण फॅमिलीसाठी एकच प्लॅन, 300GB डेटा, प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारही; किंमतही कमी

ही दूरसंचार कंपनी ग्राहकांना उत्तम ऑफर देत असून कमी किंमतीत संपूर्ण कुटुंबीयांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 04:01 PM2023-01-10T16:01:38+5:302023-01-10T16:03:05+5:30

ही दूरसंचार कंपनी ग्राहकांना उत्तम ऑफर देत असून कमी किंमतीत संपूर्ण कुटुंबीयांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे.

One plan for the whole family vodafone idea 300GB data Prime Video and Hotstar too The price is also low | संपूर्ण फॅमिलीसाठी एकच प्लॅन, 300GB डेटा, प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारही; किंमतही कमी

संपूर्ण फॅमिलीसाठी एकच प्लॅन, 300GB डेटा, प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारही; किंमतही कमी

टेलीकॉम कंपनी Vodafone-Idea (Vi) युजर्सना उत्तम ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सवलतीसह 1,299 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन घेऊ शकता. या पोस्टपेड प्लॅनवर 150 रुपयांची सूटही दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर प्लानची किंमत 1149 रुपये झाली आहे. Vodafone-Idea चा हा पोस्टपेड प्लॅन तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 5 कनेक्शनसह 300 GB डेटा आणि प्रीमियम OTT सबस्क्रिप्शन देत आहे. पाहूया काय आहे हा प्लॅन.

कंपनी 1149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 कनेक्शन देत आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा सर्वोत्तम प्लॅन ठरू शकते. यामध्ये इंटरनेट वापरासाठी एकूण 300 जीबी डेटा दिला जात आहे. यामध्ये प्राथमिक सदस्याला 140 GB आणि इतर सदस्यांना 40-40 GB डेटा मिळतो. याशिवाय कंपनी या प्लॅनमधील सर्व सदस्यांना दरमहा अमर्यादित कॉलिंग आणि 3 हजार मोफत एसएमएस देखील देत आहे.

Vodafone-Idea चा हा प्लान जबरदस्त अतिरिक्त लाभांसह येतो. प्लॅनच्या प्राइम मेंबरला कंपनी 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप मोफत देण्यात येत आहे आहे. यासोबतच प्राइम मेंबर्सना 499 रुपयांचे डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत मिळेल. या प्लॅनमध्ये उर्वरित सदस्यांना Vi MNovies आणि TV VIP चं ॲक्सेसही दिले जाईल.

1101 रुपयांच्या रेडएक्स प्लॅनचे बेनिफिट्स
कंपनीचा हा REDX प्लॅन अमर्यादित डेटा आणि कॉलिंग ऑफर करतो. प्लॅनमध्ये तुम्हाला 3000 मोफत एसएमएस देखील मिळतील. प्लॅनमध्ये, कंपनी सहा महिन्यांसाठी ॲमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शनसह एका वर्षासाठी Disney+ Hotstar Super आणि 12 महिन्यांसाठी Sony Liv चं सबस्क्रिप्शन देत आहे. हा प्लॅन 6 महिन्यांच्या लॉक-इनसह येतो. या प्लॅनपूर्वी हा प्लॅन सोडल्यास तुम्हा वन टाईम एक्झिट फी द्यावी लागते.

Web Title: One plan for the whole family vodafone idea 300GB data Prime Video and Hotstar too The price is also low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.