lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ वर्षात एक लाखाचे झाले ३२ लाख; बिहारच्या 'या' कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

१ वर्षात एक लाखाचे झाले ३२ लाख; बिहारच्या 'या' कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Aditya Vision Share Price Hike : बिहारच्या रिटेलर कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल. वर्षभरात शेअर्सच्या किंमतीत ३२१४ टक्क्यांची वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 04:19 PM2021-07-06T16:19:33+5:302021-07-06T16:21:27+5:30

Aditya Vision Share Price Hike : बिहारच्या रिटेलर कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल. वर्षभरात शेअर्सच्या किंमतीत ३२१४ टक्क्यांची वाढ.

One lakh became 32 lakh in one year; Bihar's 'Ya' company made goods for investors | १ वर्षात एक लाखाचे झाले ३२ लाख; बिहारच्या 'या' कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

१ वर्षात एक लाखाचे झाले ३२ लाख; बिहारच्या 'या' कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Highlightsबिहारच्या रिटेलर कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल. वर्षभरात शेअर्सच्या किंमतीत ३२१४ टक्क्यांची वाढ.

बिहारमधील एका रिटेलर कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ इतकी झाली की  गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे तब्बल ३२ लाख रूपये झाले. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार Aditya Vision च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात ३२१४ टक्क्यांची वाढ झाली. १ जुलै २०२० रोजी बीएसईवर या कंपनीच्या शेअरची किंमत २०.८६ रूपये इतकी होती. परंतु मंगळवारी ६ जुलै रोजी याची किंमत ६८२.७५ रूपयांवर पोहोचली. 

२०२१ हे वर्ष मल्टीबॅगर शेअर्सचं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. परंतु नंतर शेअर बाजारानं मोठी झेप घेत आजवरचा उच्चांकही गाठला. या दरम्यान अनेक शेअर्सनं मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आणि या शेअर्समध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सचा समावेश आहे. यामध्ये आदित्य विजनचंही नाव आहे.

गेल्या वर्षभरात आदित्य विजनच्या शेअर्समध्ये ३२१४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. इंट्रा डे सेशनमध्ये या रिटेलर कंपनीनं स्टॉक्सना ५ ट्रेड सेशनमध्ये शेअरधारकांना १५ टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये आदित्य विजनच्या शेअर्समध्ये १६८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या लोकांनी या शेअर्समध्ये १ लाख रूपये गुंतवले त्यांची किंमत १६.८५ लाख रूपये आहे. जर यात वर्षभरापूर्वी १ लाख रुपये गुंतवले तर त्याची किंमत आज ३२.१४ लाख रूपये इतकी आहे. ही कंपनी बिहारची असून सध्या या कंपनीनं आता बिहारच्या बाहेरही विस्ताराची योजना आखली आहे. 

Web Title: One lakh became 32 lakh in one year; Bihar's 'Ya' company made goods for investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.