lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडे, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, Ola ची मोठी घोषणा

फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडे, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, Ola ची मोठी घोषणा

Ola E-Bike Service : कंपनीने बंगळुरूमध्ये ई-बाईक सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली आणि हैदराबादमध्येही ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 10:39 AM2024-01-27T10:39:41+5:302024-01-27T10:40:21+5:30

Ola E-Bike Service : कंपनीने बंगळुरूमध्ये ई-बाईक सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली आणि हैदराबादमध्येही ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

ola unveils e-bike service in delhi hyderabad most affordable for commute within the cities check fare | फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडे, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, Ola ची मोठी घोषणा

फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडे, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, Ola ची मोठी घोषणा

नवी दिल्ली : शहरात प्रवास करण्यासाठी कॅब सर्व्हिस वापरणाऱ्या लोकांसाठी एक खुशखबर आहे. कारण, आता तुम्हाला राईडसाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ओलाने आपली ई-बाईक सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बंगळुरूमध्ये ई-बाईक सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली आणि हैदराबादमध्येही ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

ओलाने दिल्ली आणि हैदराबादमध्ये आपल्या 'राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म' अंतर्गत ई-बाईक सर्व्हिसचे अनावरण केले. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास ई-बाईक सर्व्हिसचा विस्तार करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, या ओला ई-बाईक सर्व्हिसची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी सर्वात कमी भाडे लागते. पेट्रोल बाईकने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ई-बाईक अधिक किफायतशीर ठरेल. या सर्व्हिसमुळे त्यांचे खूप पैसे वाचतील.

प्रवास होईल स्वस्त 
दिल्ली आणि हैदराबादमध्ये ओला ई-बाईक सर्व्हिसचे भाडे खूपच कमी ठेवण्यात आले आहे. पहिल्या 5 किलोमीटरसाठी 25 रुपये, 10 किमीसाठी 50 रुपये आणि 15 किमीसाठी 75 रुपये आहेत. हे भाडे कॅलक्युलेट केले तर ते प्रतिकिलोमीटर पाच रुपये होईल. ओलाने सांगितले की, ई-बाईक सर्व्हिस ही शहरांमधील वाहतुकीसाठी सर्वात किफायतशीर, टिकाऊ आणि सोयीची सेवा असणार आहे.

दरम्यान, पुढील दोन महिन्यांत दिल्ली आणि हैदराबादमध्ये 10,000 ई-बाईक तैनात करण्याची कंपनीची योजना आहे. ओला मोबिलिटीचे सीईओ हेमंत बक्षी म्हणाले की, "ओलाच्या या सर्व्हिस इलेक्ट्रिक वाहनांद्वारे 1 अब्ज भारतीयांना सेवा देण्याच्या आमच्या संकल्पनेशी सुसंगत आहे."
 

Web Title: ola unveils e-bike service in delhi hyderabad most affordable for commute within the cities check fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.