lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती

ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या भीतीने प्रवासी विमान वाहतुकीवर पुन्हा परिणाम दिसू लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:40 AM2021-12-22T10:40:11+5:302021-12-22T10:41:27+5:30

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या भीतीने प्रवासी विमान वाहतुकीवर पुन्हा परिणाम दिसू लागला आहे.

offers from airlines in omicron fear of consequences due to restrictions | ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती

ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या भीतीने प्रवासी विमान वाहतुकीवर पुन्हा परिणाम दिसू लागला आहे. प्रवासी संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. 

विमान कंपन्यांनी प्रवाशांना ऑफर्स देण्यात हात आखडता घेतला; मात्र काही विमान कंपन्यांकडून आता विविध ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. एका कंपनीने प्रवाशांना माेफत भाेजन आणि तिकीट अशी डबल ऑफर दिली आहे.  तर काही कंपन्या प्रवास भाड्यात सवलती देऊ लागल्या आहेत.
गाे फर्स्टने बंगळुरूपासून मुंंबई, दिल्ली, काेलकाता, वाराणसी, रांची, पुणे आणि लखनऊ या मार्गांवरील प्रवाशांना नवी ऑफर दिली आहे.  

प्रवाशांना माेफत जेवण आणि माेफत प्रवास, अशी डबल धमाका ऑफर आहे.  यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. तर दुसरीकडे स्पाईसजेट नेदेखील विविध फेस्टीव्ह ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या आहेत.

नोव्हेंबर महिन्यामध्ये १७ टक्क्यांची वाढ

गेल्या काही महिन्यांमध्ये विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. नाेव्हेंबरमध्ये प्रवाशांचा आकडा १७ टक्क्यांनी वाढला हाेता; मात्र ओमायक्राॅनमुळे विमान कंपन्यांवर पुन्हा एकदा संकटाचे वादळ घाेंगावू लागले आहे. अनेक देशांनी तसेच राज्यांनीही काही निर्बंध लावल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.
 

Web Title: offers from airlines in omicron fear of consequences due to restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.