lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली

लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली

Mukesh Ambani Jio: मुकेश अंबानी लवकरच UPI सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:06 PM2024-03-11T18:06:48+5:302024-03-11T18:07:42+5:30

Mukesh Ambani Jio: मुकेश अंबानी लवकरच UPI सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

Mukesh Ambani Jio: Phonepe-Paytm Concerns Raise; Jio entry in UPI segment soon | लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली

लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली

Jio UPI Payments: देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Jioने दूरसंचार क्षेत्रात मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा देऊन मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. टेलिकॉम उद्योगात इतिहास रचल्यानंतर आता मुकेश अंबानी लवकरच UPI उद्योग काबीज करण्याच्या तयारीत आहेत. या सेगमेंटमध्ये Jio आल्यानंतर PhonePe आणि Paytm ला तगडी स्पर्धा मिळेल. 

पेटीएमचे संकट जिओसाठी फायद्याचे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Jio लवकरच पेमेंट साउंडबॉक्स (Jio Soundbox) बाजारात आणण्याचा विचारात आहे. याची थेट स्पर्धा पेटीएम साउंडबॉक्सशी असेल. जिओकडून या साउंडबॉक्सची चाचणीही सुरू झाली आहे. सध्या या सेगमेंटमध्ये अनेक ॲप्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. दरम्यान, पेटीएमविरोधात आरबीआयने केलेल्या कारवाईचा मोठा फायदा मुकेश अंबानींच्या जिओला मिळू शकतो.

ग्राहकांना आकर्षक सूट मिळू शकते
UPI मार्केट काबीज करण्यासाठी मुकेश अंबानी ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर देऊ शकतात. जिओच्या या प्लॅनमुळे इतर कंपन्यांची चिंता खूप वाढली आहे. पेटीएमवर लावलेल्या बंदीचा थेट फायदा जिओला मिळू शकतो. दरम्यान, सध्या फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे आणि पेटीएम ॲप बाजारात उपलब्ध आहेत. अलीकडेच फ्लिपकार्टने देखील बाजारात UPI सेवेची सुविधा सुरू केली आहे. फ्लिपकार्टने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने UPI सुविधा सुरू केली आहे. आता यात जिओची भर पडेल.

Web Title: Mukesh Ambani Jio: Phonepe-Paytm Concerns Raise; Jio entry in UPI segment soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.