lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम

मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम

SBI कडून Rcom च्या विक्रीशी संबंधित आराखड्याला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 12:20 PM2020-03-04T12:20:46+5:302020-03-04T13:03:25+5:30

SBI कडून Rcom च्या विक्रीशी संबंधित आराखड्याला मंजुरी

Mukesh Ambani to buy Rcom from anil ambani Insolvency Resolution Plan Approved by sbi | मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम

मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम

Highlightsमुकेश अंबानी लवकरच रिलायन्स कम्युनिकेशन्स विकत घेणारव्यवहारातून ४३ हजार कोटी मिळण्याची बँकांना आशास्टेट बँक ऑफ इंडियाकडून आराखड्याला मंजुरी

नवी दिल्ली: देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) विकत घेणार आहेत. यासंदर्भातल्या आराखड्याला स्टेट बँक ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे. यामधून २३ हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा कर्जपुरवठा केलेल्या बँकांना आहे. स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशन्सला हजारो कोटींचं कर्ज दिलं होतं. 

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं आरकॉमचे टॉवर आणि फायबर बिझनेस (रिलायन्स इंफ्राटेल) खरेदी करण्यासाठी ४७०० कोटी रुपयांची ऑफर दिली. यूव्ही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं (UVARC) आरकॉम आणि रिलायन्स टेलिकॉमच्या मालमत्तेसाठी १४७०० कोटींची बोली लावली. आरकॉमला भारतीय आणि चीनमधील देणेकऱ्यांचे ४३०० कोटी रुपये प्राधान्यानं द्यायचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डनं आरकॉमच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देणेकरांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. आरकॉमवरील सुरक्षित कर्जाची रक्कम ३३ हजार कोटींच्या घरात आहे. तर देणेकऱ्यांचा दावा ४९ हजार कोटींचा आहे.  

आरकॉमच्या मालकीची मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी अनिल अंबानींनी केला होता. त्यासाठी त्यांनी मुकेश अंबानींशी संपर्क साधला होता. मात्र हा करार होऊ शकला नाही. जिओनं आरकॉमची मालमत्ता खरेदी करण्यास नकार दिला. आरकॉमवरील कर्जाच्या डोंगराचं ओझं आपल्या डोक्यावर नको, या विचारानं जिओनं आरकॉमची मालमत्ता खरेदी केली नाही. 
 

Web Title: Mukesh Ambani to buy Rcom from anil ambani Insolvency Resolution Plan Approved by sbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.