lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विजेसंदर्भात मोदी सरकारची नवी योजना, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

विजेसंदर्भात मोदी सरकारची नवी योजना, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स योजना(UDAY Scheme) घोषित केली जाऊ शकते,

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 07:05 PM2020-01-27T19:05:26+5:302020-01-27T19:15:44+5:30

केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स योजना(UDAY Scheme) घोषित केली जाऊ शकते,

Modi government's new plan on electricity, budget may be announced | विजेसंदर्भात मोदी सरकारची नवी योजना, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

विजेसंदर्भात मोदी सरकारची नवी योजना, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

Highlightsअर्थसंकल्पात उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स योजना(UDAY Scheme) घोषित केली जाऊ शकते.डिस्कॉमला पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्थसंकल्पात एका चांगल्या योजनेची घोषणा होऊ शकते. आम्ही अर्थ मंत्रालयाशी नव्या (UDAY) योजनेसंदर्भात विचारमंथन केलेलं आहे, असंही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स योजना(UDAY Scheme) घोषित केली जाऊ शकते, असं विधान केलं आहे. डिस्कॉमला पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्थसंकल्पात एका चांगल्या योजनेची घोषणा होऊ शकते. आम्ही अर्थ मंत्रालयाशी नव्या  (UDAY) योजनेसंदर्भात विचारमंथन केलेलं आहे, असंही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. ते राष्ट्रीय शेअर बाजारच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC)च्या कार्यक्रमात बोलत होते. आम्हाला आशा आहे की अर्थसंकल्पात नव्या उदय योजनेलाही जागा मिळू शकेल.  

काय आहे उदय योजना?
सरकारनं  नोव्हेंबर 2015मध्ये उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स योजना (UDAY) सुरू केली होती. या योजनेचा उद्देश वीज वितरण करणाऱ्या योजनांना वित्तीय आणि कार्यात्मक सहाय्य करण्याचा आहे. 

काय पडणार ग्राहकांवर प्रभावः
उदय योजनेचा मुख्य हेतू हा वीज बोर्डाला तोट्यातून बाहेर काढणं आणि 24 तास विजेची पूर्तता करण्याचा आहे. योजनेत बदल करून तिला आणखी अद्ययावत करता येईल. तसेच उदय योजनेंतर्गत ज्या गावांत अद्याप वीज पोहोचलेली नाही, त्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जाणार आहे. सरकारनं या योजनेत सुधारणा केल्यास ती पूर्वीपेक्षा आणखी चांगली होणार असून, दूरदूरपर्यंत वीज पोहोचवली जाणार आहे. डिस्कॉमचं नुकसान कमी करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. 

Web Title: Modi government's new plan on electricity, budget may be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.