lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता चिनी नाही तर, भारतीय कंपनी बनणार MG मोटर्स इंडिया? हे खरेदी करणार ४८% हिस्सा

आता चिनी नाही तर, भारतीय कंपनी बनणार MG मोटर्स इंडिया? हे खरेदी करणार ४८% हिस्सा

एमजी मोटर इंडिया ही शांघाय येथील SAIC मोटरची उपकंपनी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 09:53 AM2023-06-15T09:53:48+5:302023-06-15T09:54:18+5:30

एमजी मोटर इंडिया ही शांघाय येथील SAIC मोटरची उपकंपनी आहे. 

mg-motor-india-jsw-sajjan-jindal-owned-jsw-group-looks-to-buy- china-company-know-business-details | आता चिनी नाही तर, भारतीय कंपनी बनणार MG मोटर्स इंडिया? हे खरेदी करणार ४८% हिस्सा

आता चिनी नाही तर, भारतीय कंपनी बनणार MG मोटर्स इंडिया? हे खरेदी करणार ४८% हिस्सा

जेएसडब्ल्यू (JSW) समुहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल हे ऑटोमोबाईल कंपनी एमजी मोटर इंडियामधील मोठा हिस्सा खरेदी करणार आहेत. सज्जन जिंदाल हे खाजगी मालकीच्या कंपनीमार्फत एमजी मोटरमधील स्टेक खरेदी करू शकतात. एमजी मोटर इंडिया ही शांघाय येथील SAIC मोटरची उपकंपनी आहे. 

सज्जन जिंदाल एमजी मोटर इंडियामध्ये ४५-४८ टक्के हिस्सा खरेदी करू शकतात. त्याच वेळी, डीलर्स आणि भारतीय कर्मचाऱ्यांचा कंपनीमध्ये ५ ते ८ टक्के हिस्सा असू शकतो. इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. उर्वरित हिस्सा हा एसएआयसीकडेच असेल असं या व्यवसायाची माहिती असलेल्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, जेएसडब्ल्यू समूहाच्या सूचीबद्ध कंपन्या जेएसडब्ल्यू स्टील आणि जेएसडब्ल्यू एनर्जी या व्हन्चरमध्ये सहभागी होणार नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलंय.

भारतीयांचा समावेश
या डीलद्वारे, अधिकाधिक भारतीय कंपनीच्या टॉप मॅनेजमेंट आणि बोर्डात सामील होतील. हा व्यवहार अशा वेळी होणार आहे जेव्हा केंद्र सरकारनं चिनी स्मार्टफोन कंपन्यांना भारतातील व्यवसायासाठी सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी), सीओओ (मुख्य कार्यकारी अधिकारी), सीएफओ (मुख्य वित्तीय अधिकारी) आणि सीटीओ (मुख्य तांत्रिक अधिकारी) पदी भारतीयांचीच नियुक्ती करण्यास सांगितलं आहे. याशिवाय, सरकारनं त्यांना भारतीय कंत्राटी उत्पादकांची नियुक्ती करण्यास आणि स्थानिक डिस्ट्रिब्युटर्सही नियुक्त करण्यास सांगितलेय. सध्या काही चिनी मोबाईल कंपन्या त्यांची उत्पादने चिनी वितरकांमार्फत येथे विकतात.

Web Title: mg-motor-india-jsw-sajjan-jindal-owned-jsw-group-looks-to-buy- china-company-know-business-details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.