lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही

विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही

वित्तमंत्री सीतारामन यांची ग्वाही : बँकेच्या कर्मचाऱ्यांची भीती निराधार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:09 AM2019-09-02T06:09:18+5:302019-09-02T06:09:22+5:30

वित्तमंत्री सीतारामन यांची ग्वाही : बँकेच्या कर्मचाऱ्यांची भीती निराधार

The merger will not lead to a job, nirmala sitaraman | विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही

विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही

चेन्नई : दहा सरकारी बँकांच्या आपसातील नियोजित विलीनीकरणाने त्या बँकांमध्ये सध्या नोकरी करत असलेल्या एकाही कर्मचाºयाची नोकरी जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी दिली. गेल्या शुक्रवारी सीतारामन यांनी बँक विलीनीकरणाची ही घोषणा केल्यानंतर बँक अधिकारी व कर्मचारी महासंघांच्या संयुक्त कृती समितीने त्याविरुद्ध देशभर धरणे आंदोलन करून निषेध नोंदविला होता. विरोधाच्या इतर बाबींखेरीज नोकºया जाण्याची भीती त्यामागे होती. विलीनीकरणाने बँकांच्या अनेक शाखा व कार्यालये बंद होतील व साहजिकच त्यातून नोकऱ्यांवर गदा येईल, असे संघटनांचे म्हणणे होते.

विशेष म्हणजे या विलिनीकरणास विरोध करणाºयांमध्ये रा. स्व. संघाशी संलग्न भारतीय मजदूर संघाचाही समावेश असून या निर्णयाने फक्त बड्या उद्योगपतींचे हित जपले जाईल, असा या संघटनेने सूर लावला आहे. पत्रकारांनी याविषयी विचारता सितारामन म्हणाल्या, हा सर्वस्वी गैरसमज आहे. कोणाचीही नोकरी जाण्याचा यात प्रश्नच येत नाही, याची मी बँक कर्मचाºयांना खात्री देऊ इच्छिते. ही घोषणा करतानाही मी हे नमूद केले होते. वित्तमंत्री निर्मला सितारामन पुढे असेही म्हणाल्या की, विलिनीकरणाने कोणतीही बँक बंद होणार नाही.
किंवा या बँका याआधी करत होत्या त्याहून त्यांनी काही वेगळे करावे, असेही आम्ही त्यांना सांगितलेले नाही. उलट पूर्वीचेच काम अधिक जोमाने करण्यासाठी आम्ही त्यांना जास्त भांडवल दिले आहे.

आर्थिक मंदी आणि खास करून चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील फक्त पाच टक्के ‘जीडीपी’ वृद्धीदराविषयी विचारता सितारामन म्हणाल्या की, सरकारचा विविध क्षेत्रांतील लोकांशी विचार-विनिमय सुरु आहे. उद्योग क्षेत्रातील लोकांश्ी मी दोन वेळा चर्चा केली आहे. त्यांना नेमके काय हवे, सरकाकडून काय अपेक्षा आहेत, ते जाणून घेतले आहे. यानंतरही मी हे अनेक वेळा करत
राहीन. 

Web Title: The merger will not lead to a job, nirmala sitaraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.