lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्राने तारली देशाची अर्थव्यवस्था, जीडीपी वृद्धीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्राने तारली देशाची अर्थव्यवस्था, जीडीपी वृद्धीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी

सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नात (जीएसडीपी) गुजरातने उल्लेखनीय कार्य करीत २.२ पट वाढ प्राप्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:41 AM2024-03-29T11:41:16+5:302024-03-29T11:41:35+5:30

सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नात (जीएसडीपी) गुजरातने उल्लेखनीय कार्य करीत २.२ पट वाढ प्राप्त केली आहे.

Maharashtra leads the country's economy, Uttar Pradesh ranks second in GDP growth | महाराष्ट्राने तारली देशाची अर्थव्यवस्था, जीडीपी वृद्धीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्राने तारली देशाची अर्थव्यवस्था, जीडीपी वृद्धीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेने कोरोना काळानंतर उत्तम कामगिरी केली. या काळात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांचा सकळ राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) योगदान सर्वाधिक राहिले. याबाबतीत महाराष्ट्र पहिल्या, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी 
राहिला. स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

गुजरातचा जीएसडीपी दुप्पट
सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नात (जीएसडीपी) गुजरातने उल्लेखनीय कार्य करीत २.२ पट वाढ प्राप्त केली आहे. कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, सिक्किम आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांचेही यांत महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
दरडोई उत्पन्न गुजरातमध्ये सर्वाधिक १.९ टक्के वाढले. कर्नाटक आणि तेलंगणानेही याबाबतीत चांगली कामगिरी केली. राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि गोवा यांसारख्या राज्यांत दरडोई उत्पन्नात घसरण झाली. 

८.१% एवढा जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर कोरोना काळानंतर राहिला. 

५.७% जीडीपीचा वृद्धी दर कोविडपूर्व काळात होता. 

२३५ आधार अंकांची वृद्धी कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत पाहायला मिळाली.

५६ आधार अंकांचे यात महाराष्ट्राचे योगदान होते.

४० आधार अंकांचे उत्तर प्रदेशचे योगदान राहिले. 

९० अंक इतके योगदान इतर राज्यांचे राहिले. 

Web Title: Maharashtra leads the country's economy, Uttar Pradesh ranks second in GDP growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.