lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमाधारकांना उपयुक्त टिप्स अन् ट्रिक्स देणारी 'लोकमत इन्शुरन्स समिट'

विमाधारकांना उपयुक्त टिप्स अन् ट्रिक्स देणारी 'लोकमत इन्शुरन्स समिट'

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या मेनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झेक्यूटीव्ह ऑफिसर विभा पडाळकर आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 05:32 PM2019-08-29T17:32:00+5:302019-08-29T17:43:22+5:30

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या मेनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झेक्यूटीव्ह ऑफिसर विभा पडाळकर आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे.

Lokmat Insurance Summit 2019, an innovative initiative for insureds | विमाधारकांना उपयुक्त टिप्स अन् ट्रिक्स देणारी 'लोकमत इन्शुरन्स समिट'

विमाधारकांना उपयुक्त टिप्स अन् ट्रिक्स देणारी 'लोकमत इन्शुरन्स समिट'

Highlightsएचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या मेनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झेक्यूटीव्ह ऑफिसर विभा पडाळकर आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे.

मुंबई - लोकमत इन्शुरन्स समिटची पहिली आवृत्ती ग्राहक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान द्वारे विमा कंपन्यात होणारी फसवणूक टाळणे यावर केंद्रित केली आहे. इन्शुरन्स क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आणि इतर महत्वाच्या घडामोडी ग्राहकांसमोर आणण्यासाठी, लोकमत इन्शुरन्स समिट, १९ सप्टेंबर रोजी सहारा स्टार हॉटेल येथे होणार आहे. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या सहकार्याने लोकमत इन्शुरन्स समिट हे ग्राहकदृष्ट्या महत्वाचे असे चर्चासत्र ठरणारे आहे. 

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या मेनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झेक्युटीव्ह ऑफिसर विभा पडाळकर आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे. तसेच एक्सपिरियन, ऍनालीटीकल पार्टनर म्हणून या समिटमध्ये भाग घेणार आहे. हक्कपात्र असलेल्या ग्राहकांना योग्यवेळी परतावा मिळण्यासाठीचे तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी, माहिती तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या विषयांवर या उपक्रमांमध्ये अनेक परीसंवाद आयोजित केले आहे. जागतिक स्तरावरील विमा कंपन्या आणि त्यांचे अधिकारी, विमा ब्रोकर, विमा एजेंसीज, माहिती तंत्रज्ञान कंपन्या यांचा या समिटला समावेश लाभणार आहे. 

सामाजिक बांधिलकी, सत्य परिस्तिथीची जाण आणि उत्कृष्ट पत्रकारितेचा ठसा उमटवणाऱ्या लोकमतचे हे एक नवीन पाऊल आहे. गेल्या काही दशकात विमा कंपन्यांमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार ओळखून या विषयावर विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले आहे. लोकमत इन्शुरन्स समिट पुढाकार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात  जागरूकता पसरवून त्यांना विमा घेण्याचे महत्व आणि प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

लोकमत इन्शुरन्स समिटमध्ये महत्वेकरून विमा स्वीकारणारी व्यक्ति किंवा कंपनी आणि विमा कंपन्यांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान यावर परस्परसंवादचे सत्र सामील केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क www.lokmat-insurance.com किंवा ७६२० ९२३ ३०६ / ९१३७ १२१ ६१६

Web Title: Lokmat Insurance Summit 2019, an innovative initiative for insureds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.