lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PMMY अंतर्गत हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही; जाणून घ्या सविस्तर...

PMMY अंतर्गत हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही; जाणून घ्या सविस्तर...

PM Mudra Yojna : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक अशी योजना आहे, ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्यांचा चालू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा आहे अशा लोकांना त्याचा लाभ घेता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:21 PM2022-01-21T19:21:07+5:302022-01-21T19:22:07+5:30

PM Mudra Yojna : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक अशी योजना आहे, ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्यांचा चालू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा आहे अशा लोकांना त्याचा लाभ घेता येईल.

Loans up to Rs.10 lakhs without guarantee under PMMY, no processing fee; Learn more ... | PMMY अंतर्गत हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही; जाणून घ्या सविस्तर...

PMMY अंतर्गत हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही; जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (PMMY) उद्दिष्ट स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज प्रदान करणे आहे. हे कर्ज तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आधीच सुरू असलेल्या व्यवसायाला (Business) चालना देण्यासाठी घेतले जाऊ शकते. हे कर्ज हमीशिवाय (Loan Without Guarantee) मिळते आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक अशी योजना आहे, ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्यांचा चालू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा आहे अशा लोकांना त्याचा लाभ घेता येईल. MUDRA योजनेचा उद्देश स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि लघु उद्योगांद्वारे रोजगार निर्मिती करणे हा आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.

कोण घेऊ शकतो कर्ज?
कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतो. याशिवाय, जर एखादा विद्यमान व्यापारी किंवा दुकानदार आपला सध्याचा व्यवसाय पुढे नेऊ इच्छित असेल आणि त्यासाठी पैशांची गरज असेल, तर तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतो.

तीन प्रकारचे कर्ज (Types Of Mudra Loan)
शिशू कर्ज : शिशू कर्ज अंतर्गत, अर्जदार 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज अशा लोकांसाठी आहे, जे आता नवीन व्यवसाय सुरू करत आहेत.

किशोर कर्ज : किशोर कर्ज 50,000 रुपयांपासून पाच लाखांपर्यंत आहे. हे कर्ज अशा अर्जदारांसाठी योग्य आहे, ज्यांनी आधीच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु सेट करण्यासाठी आणखी काही पैशांची आवश्यकता आहे.

तरुण कर्ज : तरुण कर्ज अंतर्गत, अर्जदार 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. हे अशा लोकांना दिले जाते ज्यांचे व्यवसाय स्थापित आहेत, परंतु त्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता आहे.

अशा करू शकता अर्ज (How to Apply For Mudra Loan)
मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY), मुद्रा कर्ज जवळजवळ सर्व सरकारी आणि खाजगी बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे दिले जातात. ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे, त्या बँकेतून मुद्रा कर्जाचा फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो. त्यानंतर तो भरून बँकेत जमा करावा लागतो.नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घराच्या मालकीची किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन क्रमांकासह इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील. जर सध्याचा व्यवसाय असेल आणि त्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती देखील विचारू शकते.

Web Title: Loans up to Rs.10 lakhs without guarantee under PMMY, no processing fee; Learn more ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.