Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > किंगफिशरचे विमान राहणार जमिनीवरच?

किंगफिशरचे विमान राहणार जमिनीवरच?

बंद पडलेली खासगी विमान कंपनी किंगफिशर एअरलाईन्सच्या विमान उड्डाण परवान्याचा अवधी ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री समाप्त होत आहे.

By admin | Updated: December 29, 2014 03:52 IST2014-12-29T03:52:35+5:302014-12-29T03:52:35+5:30

बंद पडलेली खासगी विमान कंपनी किंगफिशर एअरलाईन्सच्या विमान उड्डाण परवान्याचा अवधी ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री समाप्त होत आहे.

Kingfisher aircraft will live on the ground? | किंगफिशरचे विमान राहणार जमिनीवरच?

किंगफिशरचे विमान राहणार जमिनीवरच?

नवी दिल्ली : बंद पडलेली खासगी विमान कंपनी किंगफिशर एअरलाईन्सच्या विमान उड्डाण परवान्याचा अवधी ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री समाप्त होत आहे. यामुळे किंगफिशर विमान पुन्हा झेपावण्याचा मार्ग पूर्णत: बंद होईल.
विजय माल्या यांच्या मालकीच्या किंगफिशरची विमान सेवा आॅक्टोबर २०१२ पासून ठप्प आहे. कंपनीचा विमानोड्डाण परवाना आॅक्टोबर २०१२ मध्येच समाप्त झाला होता. परवाना नूतनीकरणासाठी कंपनीद्वारे समाधानकारक प्रस्ताव सादर करण्यात न आल्याने तिचा परवाना नूतनीकरण करण्यास नागरी विमान महासंचालनालयाने नकार दिला होता. तथापि, यानंतर कंपनीला परवाना नूतनीकरण करून घेण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी समाप्त होत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘किंगफिशरचा उड्डाण परवाना ३१ डिसेंबरला समाप्त होत आहे. म्हणजेच किंगफिशरला पुन्हा कामकाज सुरू करावयाचे असल्यास नव्याने अर्ज करावा लागेल.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)























 

Web Title: Kingfisher aircraft will live on the ground?