Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती?

Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती?

Jagdeep Singh Salary: जगदीप सिंग हे जगात सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी आहेत. प्रत्येक दिवसाला त्यांची कमाई ४९ कोटी रुपये इतकी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 01:14 IST2025-01-05T01:09:34+5:302025-01-05T01:14:52+5:30

Jagdeep Singh Salary: जगदीप सिंग हे जगात सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी आहेत. प्रत्येक दिवसाला त्यांची कमाई ४९ कोटी रुपये इतकी आहे. 

jagdeep singh who is world’s highest-paid employee in the world | Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती?

Jagdeep Singh: दरदिवशी 48 कोटी! जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज किती?

Jagdeep Singh Highest Paid Employee: जगात सर्वाधिक पगार घेणारा व्यक्ती एक भारतीय असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. या व्यक्तीचे नाव आहे, जगदीप सिंग! जगदीप सिंग हे जगात सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी ठरले आहेत. त्यांचा वर्षाचा पगार १७,५०० कोटी रुपये इतका आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जगदीप सिंग हे टेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जी या नव्या विस्तारत असलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीत काम करतात. या कंपनीचे नाव आहे, क्वांटमस्केप. जगदीप सिंग हे या कंपनीचे सीईओ होते. 

इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये ही आघाडीची कंपनी आहे. या कंपनीत काम करत असलेल्या जगदीप सिंग यांची दिवसाची कमाई ४८ कोटी रुपये इतकी आहे. तर वर्षाची १७,५०० कोटी रुपये इतकी.

जगदीप सिंग यांचे काय झाले आहे शिक्षण?

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, जगदीप सिंग यांचे बी.टेकचे शिक्षण स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात झाले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदव्युत्तर पदवी घेतली. गेल्या एका दशकात त्यांनी अनेक कंपन्यात काम केले. २०१० मध्ये क्वांटमस्केप लॉन्च करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. 

जगदीप सिंग यांच्या नेतृत्वात क्वांटमस्केप कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मितीत वेगाने प्रगती केली. ही कंपनी अत्याधुनिक बॅटरी निर्मितीवर लक्ष्य केंद्रीत करून काम करते. पारंपरिक लिथिअम-आयर्न बॅटरीच्या तुलनेत या बॅटरी चांगल्या आहेत. पटकन चार्जिंग आणि अधिक सुरक्षित आहेत.

जगदीप सिंग यांनी सीईओ पदाचा दिला राजीनामा

वेगाने प्रगती करत असलेल्या क्वांटमस्केप कंपनीच्या सीईओपदाचा जगदीप सिंग यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये राजीनामा दिला होता. शिवा शिवराम यांच्याकडे त्यांनी पदभार दिला. पण, कंपनीच्या संचालक मंडळात कायम आहेत. जगदीप सिंग सीईओ असतानाच्या काळात कंपनीने चांगली आर्थिक प्रगती केली. त्याचाच परिणाम म्हणून त्यांचा पगारात दिसून आला. 

Web Title: jagdeep singh who is world’s highest-paid employee in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.