lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

Bank Holiday : होळी सण उद्या म्हणजेच 18 मार्च 2022 रोजी देशभरात साजरा करण्यात येणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:29 PM2022-03-17T17:29:53+5:302022-03-17T17:30:25+5:30

Bank Holiday : होळी सण उद्या म्हणजेच 18 मार्च 2022 रोजी देशभरात साजरा करण्यात येणार आहे. 

is it a bank holiday on march 18 for holi in your state | होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक राज्यात होळीच्या दिवशी बँकेला सुट्टी असते असे नाही. मात्र, बहुतेक राज्यांमध्ये होळीच्या दिवशी बँकेला सुट्टी असते. होळी हा एक लोकप्रिय भारतीय सण आहे. हा सण उद्या म्हणजेच 18 मार्च 2022 रोजी देशभरात साजरा करण्यात येणार आहे. 

गुजरात, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, गोवा, बिहार, छत्तीसगड, मेघालय, हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर या राज्यांत 18 मार्चला (शुक्रवार) होळीच्या दिवशी बँका बंद राहतील.

कोणत्या राज्यात बँका बंद राहणार नाहीत?
दरम्यान, कर्नाटक, ओडिसा, तामिळनाडू, मणिपूर, केरळ आणि बंगालमध्ये बँका बंद नाहीत. या राज्यांतील बँकांचे काम नियमितपणे सुरू राहणार आहे. याचबरोबर, 19 मार्चला (होळी/याओसांग नंतरच्या दिवशी), ओडिसा, मणिपूर, बिहारमध्ये बँका बंद राहतील आणि त्यानंतर रविवारी सुट्टी असेल.

सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जाण्याचे नियोजन करा
बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. मार्च महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. त्यामुळे, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जाण्याचे नियोजन करणे चांगले ठरेल. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

बँक सुट्ट्यांची यादी 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राज्य-निहाय बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. तसेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय, महिन्याच्या यादीसोबत हे देखील सांगण्यात येत आहे की, कोणत्या दिवशी बँका कोणत्या राज्यात बंद राहतील आणि कुठे चालू राहतील. 

Read in English

Web Title: is it a bank holiday on march 18 for holi in your state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.