lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इन्फोसिसला 6 वर्षांतील सर्वात मोठा झटका, काही मिनिटांत बुडाले 45 हजार कोटी 

इन्फोसिसला 6 वर्षांतील सर्वात मोठा झटका, काही मिनिटांत बुडाले 45 हजार कोटी 

इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:12 PM2019-10-22T12:12:59+5:302019-10-22T12:13:19+5:30

इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं.

infosys stock down more than 15 percent biggest single day fall in 6 years whistleblower | इन्फोसिसला 6 वर्षांतील सर्वात मोठा झटका, काही मिनिटांत बुडाले 45 हजार कोटी 

इन्फोसिसला 6 वर्षांतील सर्वात मोठा झटका, काही मिनिटांत बुडाले 45 हजार कोटी 

मुंबईः देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावल्यानंतर आज सकाळी शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणाकडे आधीपासूनच विकत घेतलेले शेअर्स असल्यास त्यांनी ते विकू नयेत. तसेच या काळात कोणतीही नवी गुंतवणूक करू नका. रिपोर्टनुसार, इन्फोसिसनं नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अनैतिक पावलं उचलली आहेत. या प्रकरणी एका ग्रुपनं इन्फोसिस बोर्डाला पत्र लिहून माहिती दिली आहे. 

चौकशीसाठी तयार इन्फोसिस- सप्टेंबरमध्ये व्हिसलब्लोअरकडून दोन तक्रारी मिळाल्या. शार्दुल अमरचंद मंगलदास प्रकरणात व्हिसलब्लोअर (Whistleblower) च्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे, असंही इन्फोसिसनं सांगितलं आहे.

का आली शेअर्समध्ये घसरणः इन्फोसिसबाबतीत व्हिसलब्लोअर्सने कंपनीच्या बोर्डाला या प्रकरणात एक पत्र 20 सप्टेंबरला लिहिलं होतं. पत्रात लिहिलं होतं की, इन्फोसिस स्वतःचा नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत आहे. कंपनीचे सध्याचे सीईओ सलील पारेखही यांचाही यात सहभाग आहे. तर दुसरं एक पत्र 27 सप्टेंबरला अमेरिकी शेअर बाजार रेग्युलेटर यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनलाही देण्यात आलं आहे. खरं तर इन्फोसिसचा एडीआर हा न्यूयॉर्क एक्स्चेंजमध्येही आहे. सोमवारी ADR 12 टक्क्यांहून खाली घसरला होता. त्यामुळेच इन्फोसिसचे शेअर्स 15 टक्क्यांनी अधिकनं पडले आहेत. 

शेअरमध्ये आली 6 वर्षांतील मोठी घसरण- इन्फोसिसचे शेअर्समध्ये 6 वर्षांहून अधिकची घट नोंदवली गेली आहे. शेअर घसरले तेव्हा कंपनीचं बाजार भांडवली मूल्य 3.28 लाख कोटी रुपयांवरून पडून 2.83 लाख रुपयांवर आले होते. 

Web Title: infosys stock down more than 15 percent biggest single day fall in 6 years whistleblower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.