Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतातील बेरोजगारी सध्या उच्चांकावर

भारतातील बेरोजगारी सध्या उच्चांकावर

भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी, २0१९ मध्ये वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:04 AM2019-03-07T04:04:26+5:302019-03-07T04:04:39+5:30

भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी, २0१९ मध्ये वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

India's unemployment right now stands at the apex | भारतातील बेरोजगारी सध्या उच्चांकावर

भारतातील बेरोजगारी सध्या उच्चांकावर

नवी दिल्ली : भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी, २0१९ मध्ये वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर, २0१६ नंतरचा हा उच्चांक ठरला आहे. फेब्रुवारी, २0१८मध्ये बेरोजगारीचा दर ५.९ टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांनी सांगितले की, वास्तविक देशातील रोजगार मागणाऱ्यांची संख्या घटली आहे. तरीही श्रम शक्ती सहभाग दर (लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट) घटल्यामुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये रोजगारप्राप्त व्यक्तींची संख्या सुमारे ४00 दशलक्ष होती. आदल्या वर्षी हा आकडा ४0६ दशलक्ष होता.
सीएमआयईने भारतात हजारो घरांत प्रत्यक्ष केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल जारी केला आहे. सीएमआयईची आकडेवारी सरकारच्या आकडेवारीपेक्षा अधिक विश्वासार्ह असल्याचे अनेक अर्थतज्ज्ञ मानतात. नोटाबंदीचा रोजगार आणि छोट्या व्यवसायांवर काय परिणाम झाला, याची कोणतीही आकडेवारी आपल्याकडे नसल्याचे सरकारने गेल्या महिन्यात संसदेत सांगितले होते.
>४५ वर्षांतील सर्वाधिक?
मे महिन्याच्या सुरुवातीला देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी प्रतिकूल आहे.
अलीकडे सरकारने बेरोजगारीची आकडेवारीच जाहीर केलेली नाही. डिसेंबरमध्ये सरकारने रोखलेली आकडेवारी एका स्थानिक दैनिकाच्या हाती लागली होती. त्यानुसार, भारतातील २0१७-१८ या वर्षातील बेरोजगारीचा दर ४५ वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे.

Web Title: India's unemployment right now stands at the apex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी