lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुना!

अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुना!

भारतीय वंशाच्या एका आरोपीने अमेरिकेच्या माजी सैनिक व्यवहार विभागाला २९ दशलक्ष डॉलरला फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:16 AM2019-11-16T04:16:17+5:302019-11-16T04:16:28+5:30

भारतीय वंशाच्या एका आरोपीने अमेरिकेच्या माजी सैनिक व्यवहार विभागाला २९ दशलक्ष डॉलरला फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Indian man loses US ex-servicemen division! | अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुना!

अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुना!

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या एका आरोपीने अमेरिकेच्या माजी सैनिक व्यवहार विभागाला २९ दशलक्ष डॉलरला फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे. आपल्या गुन्ह्याची कबुलीही आरोपीने दिली आहे. अमेरिका सरकारकडून माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक लाभात घोटाळा केल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे.
निमेश शाह (३६), असे आरोपीचे नाव असून, तो ‘ब्ल्यू स्टार लर्निंग’ या संस्थेचा मालक आहे. ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिका सरकारने सुरू केलेल्या जीआय बिल लाभ योजनेत घोटाळा केल्याची कबुली त्याने दिली आहे. ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकी सरकारने माजी सैनिक आणि अन्य पात्र नागरिकांना शिक्षण आणि निवास व्यवस्थेचा खर्च भागविण्याकरिता रोख लाभ देण्यासाठी जीआय बिल योजना आखली होती. या योजनेत माजी सैनिकांची ट्यूशन फी सरकारकडून थेट शाळेला दिली जाते. अर्धवेळ व त्यापेक्षा अधिक वेळेसाठी नावनोंदणी करणाºया माजी सैनिकांना मासिक घरभाडेभत्ताही सरकारकडून दिला जातो. पुस्तके, खानपानाचे साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चासाठीही काही रक्कम सरकारकडून दिली जाते.
शाहने ‘प्ली अ‍ॅग्रिमेंट’मध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मार्च २0१६ ते जून २0१९ या काळात त्याने हा घोटाळा केला. नियमानुसार, माजी सैनिकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात किमान १५ टक्के प्रशिक्षणार्थी बिगर-माजी सैनिक असणे आवश्यक आहे. त्याच्या ‘ब्ल्यू स्टार लर्निंग’ या प्रशिक्षण केंद्रात सर्व १00 टक्के प्रशिक्षणार्थी माजी सैनिक होते. (वृत्तसंस्था)
>शैक्षणिक लाभ योजनेत २९ दशलक्ष डॉलरचा घोटाळा
या योजनेत शाह याने खोटी माहिती देऊन माजी सैनिक विभागाकडून निधी उकळला. ट्यूशन फी पोटी त्याच्या प्रशिक्षण संस्थेला ११ दशलक्ष डॉलर, तर घरभाडेभत्ता व छात्रवृत्ती (स्टायपेंड) या पोटी १८ दशलक्ष डॉलर माजी सैनिक विभागाने दिले.
शाह याची पत्नी निधी शाह (३४) हिच्यावरही खोटे निवेदन केल्याचा आरोप असून, तिनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: Indian man loses US ex-servicemen division!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.