lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगाच्या विकासाची गती मंदावली, IMFने धरलं भारताला जबाबदार

जगाच्या विकासाची गती मंदावली, IMFने धरलं भारताला जबाबदार

गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेल्या दशेत असल्याचं अनेकदा समोर आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 08:47 AM2020-01-21T08:47:25+5:302020-01-21T08:56:12+5:30

गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेल्या दशेत असल्याचं अनेकदा समोर आलं.

india responsible for 80 percent of slashed global growth imf chief economist gita gopinath | जगाच्या विकासाची गती मंदावली, IMFने धरलं भारताला जबाबदार

जगाच्या विकासाची गती मंदावली, IMFने धरलं भारताला जबाबदार

Highlightsगेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेल्या दशेत असल्याचं अनेकदा समोर आलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा अंदाज आणखी घटवला आहे. आर्थिक वर्षं 2019-20मध्ये भारताची सकल घरगुती उत्पादना(जीडीपी)तील वाढ ही फक्त 4.8 टक्के राहणार आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेल्या दशेत असल्याचं अनेकदा समोर आलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा अंदाज आणखी घटवला आहे. आर्थिक वर्षं 2019-20मध्ये भारताची सकल घरगुती उत्पादना(जीडीपी)तील वाढीचा अंदाज हा फक्त 4.8 टक्के राहणार आहे. भारत आणि त्याच्या सारख्याच इतर उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेत सुस्ती आल्यानं जगातील वाढीचा अंदाज कमी करावा लागला आहे. आयएमएफनं दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचा(WEF)च्या बैठकीदरम्यान या विकासदराचा अंदाज घटवला आहे. 

इंडिया टुडेच्या न्यूज डायरेक्टर राहुल कंवल यांच्याशी बातचीत करताना आयएमएफची मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी जागतिक वाढीच्या अंदाजात 80 टक्के घसरणीकरिता भारत जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. 2019चा जागतिक विकासदर 2.9 टक्के आणि 2020साठी त्याच विकासदराचा अंदाज 3.3 टक्के नोंदवण्यात आला आहे. जो ऑक्टोबर महिन्यात 0.1 टक्क्यानं कमी आहे. 
भारतीय अर्थव्यवस्थेनं जगाला कशा पद्धतीनं प्रभावित केलं, याचं उदाहरणही त्यांनी दिलं आहे.

भारताच्या पहिल्या दोन तिमाहीचा अंदाज तुलनेनं कमकुवत आहे. गैर बँकिंग वित्तीय क्षेत्रात असलेली उदासीनता आणि ग्रामीण क्षेत्रात उत्पन्नात आलेल्या कमीमुळे भारताचा आर्थिक विकासदर घटवल्याचंही त्यांनी सांगितलं. 2020पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 5.8 टक्के आणि पुढे 2021मध्ये 6.5 टक्के होऊ शकते. भारताला प्रगती करताना आम्ही पाहतोय. पुढच्या वित्त वर्षात भारत ठरलेलं लक्ष्य गाठू शकतो. सरकारसमोर सर्वात मोठी समस्या एनपीएची आहे, असंही  गीता गोपीनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. 

Web Title: india responsible for 80 percent of slashed global growth imf chief economist gita gopinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.