lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती

IBPS SO 2020 Recruitment News : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

By बाळकृष्ण परब | Published: November 6, 2020 03:01 PM2020-11-06T15:01:12+5:302020-11-06T15:08:30+5:30

IBPS SO 2020 Recruitment News : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

IBPS SO 2020 Recruitment: Golden opportunity of job in banking sector, bumper recruitment for the post of SO | बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती

Highlightsइंडियन इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल ने स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६४५ पदांची भरती होणार आहेया भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इ्च्छिणारे उमेदवार IBPS चे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ibps.in वर जाऊन आपला अर्ज दाखल करू शकतात.

नवी दिल्ली - बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल ने स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६४५ पदांची भरती होणार आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इ्च्छिणारे उमेदवार IBPS चे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ibps.in वर जाऊन आपला अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२० ही शेवटची तारीख आहे. या पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. आयबीपीएसच्या वेळापत्रकानुसार एसओ पदासाठीची पूर्व परीक्षा २६ आणि २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित होणार आहे. तर मुख्य परीक्षा ही ३० जानेवारी रोजी होईल.

या भरती प्रक्रियेमधून आयटी ऑफिसर स्केल १-२० पोस्ट, अ‍ॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर -४८५ पोस्ट, मार्केटिंग ऑफिसर ६० पोस्ट, लॉ ऑफिसर ५० पोस्ट, एचआर पर्सनल ऑफिसर स्केल ७ या पदांवर नियुक्त्या होणार आहेत.

या भरती प्रक्रियेमधील महत्त्वाच्या तारखा
- रजिस्ट्रेशनची तारीख - २ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२०
- नोंदणी अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क भरणा - २ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२०
- आयबीपीएस अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची तारीख - डिसेंबर २०२०
- पूर्व परीक्षा निकाल - जानेवारी २०२१
- आयबीपीएस मेन्स अ‍ॅडमिट कार्ड - जानेवारी २०२१
- आयबीपीएस मुख्य परीक्षा - जानेवारी २०२१
- ऑनलाइन मुख्य परीक्षा निकाल - फेब्रुवारी २०२१

Read in English

Web Title: IBPS SO 2020 Recruitment: Golden opportunity of job in banking sector, bumper recruitment for the post of SO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.