Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > होर्मुझ नाकेबंदीने भारतावर संकट! कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली शंभरी

होर्मुझ नाकेबंदीने भारतावर संकट! कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली शंभरी

Crude Oil Prices: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नौदलाद्वारे नाकेबंदी करण्याची घोषणा केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत भूकंप झाला आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी थेट शंभरी ओलांडली असून, ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय क्रूड तेलाच्या किमतींत ६ ते ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:34 IST2026-04-14T09:33:13+5:302026-04-14T09:34:58+5:30

Crude Oil Prices: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नौदलाद्वारे नाकेबंदी करण्याची घोषणा केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत भूकंप झाला आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी थेट शंभरी ओलांडली असून, ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय क्रूड तेलाच्या किमतींत ६ ते ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Hormuz blockade poses a crisis for India! Crude oil prices cross 100 mark again | होर्मुझ नाकेबंदीने भारतावर संकट! कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली शंभरी

होर्मुझ नाकेबंदीने भारतावर संकट! कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली शंभरी

नवी दिल्ली -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नौदलाद्वारे नाकेबंदी करण्याची घोषणा केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत भूकंप झाला आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी थेट शंभरी ओलांडली असून, ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय क्रूड तेलाच्या किमतींत ६ ते ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या तणावामुळे भारतासह जागतिक अर्थव्यवस्थांना फटका बसणार आहे, असे जाणकारांनी सांगितले. नाकेबंदीच्या घोषणेनंतर आशियाई शेअर बाजारांतही मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

इराण आता जमिनीवरील मार्ग व कॅस्पियन समुद्रातील बंदरांवर अवलंबून राहील. जर इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांच्या वाहतुकीत अडथळा आणला, तर परिस्थिती आणखी भीषण होईल. सध्या इराणमध्ये ४८% महागाई असून चलन कमालीचे घसरले आहे.

महागाईचा भडका : भारताचे इंधन आयातीचे बिल १५० अब्ज डॉलरवरून २५० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची भीती आहे. तेलाचे दर प्रति बॅरल १२० ते १४० डॉलरपर्यंत राहिल्यास महागाई गगनाला भिडू शकते.

निर्यात आणि रोजगार : भारताच्या एकूण निर्यातीपैकी २०% माल होर्मुझच्या मार्गावरून जातो. ९ लाख भारतीय कामगार मायदेशी परतले आहेत. त्याचा मोठा फटका केरळसारख्या राज्यांना बसतोय.

सावधगिरीचा इशारा : बाजारात सध्या मोठी अस्थिरता असून मोठ्या संस्था नफा कमावत असल्या तरी किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. अशा वातावरणात घाईघाईने व्यवहार करू नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

तेल संकटात चीनला संधी
युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असताना चीनचे वर्चस्व वाढत आहे. तेलाचा तुटवडा, वाढत्या किमतींमुळे जग सौर ऊर्जा आणि ई-वाहनांकडे वळत आहे.
बॅटरी आणि सौर तंत्रज्ञानात चीन अग्रेसर आहे. त्यामुळे हे संकट चीनसाठी नवी संधी ठरणार आहे. चीन या स्थितीचा फायदा घेऊन आपली बाजारपेठ अधिक भक्कम करेल.

Web Title : होर्मुज नाकेबंदी से भारत पर संकट; कच्चे तेल की कीमतें 100 डॉलर पार

Web Summary : ट्रम्प की होर्मुज नाकेबंदी से वैश्विक अर्थव्यवस्था में भूचाल। तेल की कीमतें बढ़ीं, भारत की अर्थव्यवस्था प्रभावित। ईंधन बिल बढ़ने से महंगाई का डर। नौकरी छूटने और निर्यात में बाधाओं से चिंता। ऊर्जा संकट से चीन को फायदा।

Web Title : Hormuz blockade endangers India; Crude oil prices cross $100 mark.

Web Summary : Trump's Hormuz blockade sparks global economic turmoil. Oil prices surge, impacting India's economy. Inflation fears rise with potential fuel bill increases. Job losses and export disruptions add to concerns. China benefits from the energy crisis.