lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अडीच वर्षांमधील सर्वाधिक साप्ताहिक वाढ

अडीच वर्षांमधील सर्वाधिक साप्ताहिक वाढ

प्रसाद गो. जोशी जगभरामध्ये असलेले सकारात्मक वातावरण, परदेशी वित्तसंस्थांसह गुंतवणूकदारांनी केलेली मोठी गुंतवणूक यामुळे शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहामध्ये ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:42 AM2020-06-08T02:42:37+5:302020-06-08T02:43:03+5:30

प्रसाद गो. जोशी जगभरामध्ये असलेले सकारात्मक वातावरण, परदेशी वित्तसंस्थांसह गुंतवणूकदारांनी केलेली मोठी गुंतवणूक यामुळे शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहामध्ये ...

The highest weekly growth in two and a half years | अडीच वर्षांमधील सर्वाधिक साप्ताहिक वाढ

अडीच वर्षांमधील सर्वाधिक साप्ताहिक वाढ

प्रसाद गो. जोशी

जगभरामध्ये असलेले सकारात्मक वातावरण, परदेशी वित्तसंस्थांसह गुंतवणूकदारांनी केलेली मोठी गुंतवणूक यामुळे शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहामध्ये सुमारे ६ टक्के वाढ झाली. बाजारामध्ये झालेली वाढ चांगली असून आॅक्टोबर २०१७ नंतर प्रथमच बाजाराने सर्वाधिक साप्ताहिक वाढ नोंदविलेली दिसून येत आहे.

लॉकडाऊननंतर व्यवहार हळूहळू सुरू होत असून, भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जोर पकडण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली दिसली. परकीय वित्तसंस्थांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली दिसून आली.
आगामी सप्ताहामध्ये बाजार वाढण्याची चिन्हे आहे. अमेरिकेतील व्याजवाढीबाबतचा निर्णय, एप्रिल महिन्यातील देशातील औद्योगिक उत्पादन तसेच चलनवाढीचा दर यावर बाजार अवलंबून राहील.

च्परकीय वित्तसंस्था तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून गतसप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली दिसून आली. परकीय वित्तसंस्थांनी केवळ गुरुवारच्या दिवसामध्ये २९०५.०४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. त्याचप्रमाणे देशांतर्गत वित्तसंस्थांनीही मोठी खरेदी करून बाजाराला हात दिल्याचे दिसून आले.
च्रिलायन्सने आणलेल्या राइट्स इश्यूला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ५२,१२४ कोटी रुपयांच्या या इश्यूला १५९ टक्के प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान गुरुवारी कंपनीच्या बाजार भांडवलमूल्याने १० हजार कोटी रुपयांचा टप्पा पुन्हा ओलांडलेला दिसून आला.
 

Web Title: The highest weekly growth in two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.