lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उन्हाळा कडक : एसी, सनस्क्रीनची विक्री वाढू लागली, दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढणार

उन्हाळा कडक : एसी, सनस्क्रीनची विक्री वाढू लागली, दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढणार

Summer: आता उन्हाळा जाणवू लागला असून, वातानुकूलित यंत्रे (एसी) आणि सनस्क्रीनच्या विक्रीत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून असे ३ महिने देशात भीषण उष्णता राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 05:59 AM2024-04-06T05:59:59+5:302024-04-06T06:00:21+5:30

Summer: आता उन्हाळा जाणवू लागला असून, वातानुकूलित यंत्रे (एसी) आणि सनस्क्रीनच्या विक्रीत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून असे ३ महिने देशात भीषण उष्णता राहील.

Harsh Summer: Sales of AC, Sunscreen will increase, demand for daily use items will increase | उन्हाळा कडक : एसी, सनस्क्रीनची विक्री वाढू लागली, दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढणार

उन्हाळा कडक : एसी, सनस्क्रीनची विक्री वाढू लागली, दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढणार

 नवी दिल्ली - आता उन्हाळा जाणवू लागला असून, वातानुकूलित यंत्रे (एसी) आणि सनस्क्रीनच्या विक्रीत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून असे ३ महिने देशात भीषण उष्णता राहील. त्यामुळे या काळात दैनंदिन वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि टिकाऊ ग्राहक वस्तू (कंझ्युमर ड्युरेबल्स) यांच्या मागणीत जोरदार वाढ होईल.

एसी बाजारातील आघाडीची कंपनी व्होल्टासच्या प्रवक्त्याने सांगितले की, यंदा एसीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारात विक्री २ अंकी वाढेल, अशी अपेक्षा आहे. छोट्या आणि मध्यम बाजारात अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आमच्या कंपनीने आपल्या ४ कारखान्यांतील उत्पादनात वाढ केली आहे.

व्होल्टास, हायर आणि इतर कंपन्यांसाठी कंत्राटाद्वारे एयर कंडिशनर उत्पादित करणारी कंपनी ईपॅक ड्युरेबलचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजय डीडी सिंघानिया यांनी सांगितले की, यंदा विक्रीत १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १ कोटी एसी विकले होते. यंदा हा आकडा १.१५ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आम्ही १०० टक्के क्षमतेने काम करीत आहोत. या काळात बाटलीबंद पाण्याची विक्रीही वाढली आहे.

डिऑडरंटला जोरदार मागणी
वाइल्ड स्टोन या ब्रँडनेमने डिऑडरंट बनविणारी कंपनी मॅक्नरोचे व्यवसाय विकास प्रमुख अंकित डागा यांनी सांगितले की, सनस्क्रीनच्या विक्रीत २० टक्के वाढ झाली आहे. डिओच्या विक्रीत १८% वाढ होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Harsh Summer: Sales of AC, Sunscreen will increase, demand for daily use items will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.