lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी वार्षिक रिटर्न आणि ऑडिटचा यक्षप्रश्न

जीएसटी वार्षिक रिटर्न आणि ऑडिटचा यक्षप्रश्न

करदात्यांनी रिटर्न वेळेवर आणि काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 11:57 PM2019-12-01T23:57:30+5:302019-12-01T23:57:46+5:30

करदात्यांनी रिटर्न वेळेवर आणि काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करावा.

 GST Annual Return and Audit Questionnaire | जीएसटी वार्षिक रिटर्न आणि ऑडिटचा यक्षप्रश्न

जीएसटी वार्षिक रिटर्न आणि ऑडिटचा यक्षप्रश्न

सीए- उमेश शर्मा

करनीती भाग ३१४

जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी आॅडिटचे फॉर्म फाईल करावे किंवा नाही, हा यक्ष प्रश्न आहे’
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी आॅडिट भरण्यासाठी काय वाद विवाद चालू आहे?
कृष्ण : (काल्पनिक पात्र): अर्जुना, १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे. जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९८ साधे व सोपे केले आहे. आताच्या टिष्ट्वटनुसार नवीन फॉर्म १० डिसेंबर २०१९ पासून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. तरी आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की, १० डिसेंबर अगोदर जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९८ दाखल करावे किंवा नाही.
अर्जुन : कृष्णा, वार्षिक वर्ष २०१७-१८साठी जीएसटीआर-९ दि.१० डिसेंबर अगोदर करदात्यांनी भरले तर काय?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांना १० डिसेंबर २०१९ अगोदर जीएसटीआर-९ वार्षिक वर्ष २०१७-१८ फॉर्म भरल्यास त्यांना खालील प्रमाणे संपूर्ण माहिती कदाचित दाखल करावी लागेल.
करपात्र आउटवर्ड सप्लाय आणि के्रडिट नोट व डेबिट नोट नोंदविणाऱ्या करदात्यांना भरावे लागू शकते.
दुरुस्ती केलेले आउटवर्ड सप्लायची माहिती करदात्यांना द्यावी लागू शकते.
करदात्यास स्टंट, नीलरेटेड, नॉन-जीएसटी सवलतीच्या पुरवठ्याची माहिती के्रडिट नोट व डेबिट नोट सोबत भरावी लागू शकते.
करदात्यांना डिमांड आणि रिफंडचे तपशील टेबल १५ मध्ये भरावे लागू शकते.
करदात्यांना इनपूट, इनपूट सर्विस आणि कॅपिटल गूडस यांच्या संबंधितील विभाजन नोंदवावे लागू शकते. रिव्हर्स चार्ज मेक्यनिझम अंतर्गतचे विभाजन भरावे लागू शकते.
करदात्यांना इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लायचे एचएसएनचे सारांश भरावे लागू शकते.
१४ नोव्हेंबर २०१९च्या अधिसूचने नुसार वरील सगळी माहिती देणे किंवा नाही हा पर्याय दिला आहे. पण, १० डिसेंबर २०१९ अगोदर जर कुणाला जुन्या फॉर्ममध्ये रिटर्न दाखल करायचा असेल, तर त्यासंबंधी योग्य नोट देणे करदात्यांना द्यावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी १० डिसेंबर २०१९ अगोदर आर्थिक वर्ष जीएसटीआर-९८ भरल्यास काय?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांनी १० डिसेंबर २०१९ अगोदर आर्थिक वर्ष जीएसटीआर-९८ भरल्यास खालीलप्रमाणे तपशील द्यावे लागणार :
कॅश फ्लो स्टेटमेंट उपलब्ध करून द्यावे लागेल.
प्रमाणपत्रामध्ये टू अ‍ॅण्ड फेअर या शब्दा ऐवजी टू अ‍ॅण्ड करेक्ट शब्द वापरता येणार नाही.
करदात्यास आर्थिक वर्षातील एकूण उलाढालचे रिकंसिलेशन टेबल ५ मध्ये द्यावे लागेल.
चालू आणि पुढील वर्षात पूर्वीच्या वर्षातील बुक केलेल्या आयटीसीचा दावा केला असेल, तर त्याची माहिती करदात्यांना द्यावी लागू शकते.
करदात्यास आयटिसीचा खर्च तक्ता १४ मध्ये माहिती द्यावी
लागू शकते
१४ नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार वरील सगळी माहिती देणे किंवा नाही हा पर्याय दिला आहे. पण, १० डिसेंबर २०१९ अगोदर जर कुणाला जुन्या फॉर्ममध्ये रिटर्न दाखल करायचा असेल. त्यासंबंधी योग्य डिसक्लोजर करदात्यांना द्यावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९८ आर्थिक वर्ष २०१७-१८ १० डिसेंबर २०१९ नंतर भरल्यास काय?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९८ नवीन फॉर्म १० डिसेंबर २०१९ नंतर येणार आहे. करदात्यांना थोडा आराम मिळणार आहे. पण, जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१८-१९चे वार्षिक रिटर्न आणि आॅडिट कधी भरावे?
कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २०१८-१९ जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सीचे नवीन फॉर्म अजूनपर्यंत आलेले नाही. अर्जुन: कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सीमध्ये बदल केल्यामुळे १० डिसेंबर २०१९ अगोदर भरावे किंवा नाही, सगळे गोंधळात पडले आहेत. तरी आॅडिट रिपोर्ट व रिटर्न फॉर्म भरताना त्यासंबंधित योग्य डिसक्लोजर व नोट करदात्यांनी आणि आॅडिटरनी द्यावी. तरी करदात्यांनी रिटर्न वेळेवर आणि काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करावा.

Web Title:  GST Annual Return and Audit Questionnaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी