lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त ऑफर! गॅस सिलिंडर बुक करा; 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

जबरदस्त ऑफर! गॅस सिलिंडर बुक करा; 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

Gas Cylinder Cashback: नेहमी प्रमाणे 1 डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. मात्र, 15 डिसेंबरला तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 06:38 PM2020-12-19T18:38:14+5:302020-12-19T18:39:18+5:30

Gas Cylinder Cashback: नेहमी प्रमाणे 1 डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. मात्र, 15 डिसेंबरला तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे.

Great offer! Book a gas cylinder on Paytm; Get cashback up to Rs.500 | जबरदस्त ऑफर! गॅस सिलिंडर बुक करा; 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

जबरदस्त ऑफर! गॅस सिलिंडर बुक करा; 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

काही दिवसांपूर्वीच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी ५० रुपयांनी सिलिंडरची किंमत वाढवून ग्राहकांचा खिसा कापला आहे. आता एका अॅपवर गॅस सिलिंडर बुक केल्यास ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे. 


पेटीएमने (Paytm) ही ऑफर काढली आहे. पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक (Book LPG Cylider by Paytm) केल्यास त्या ग्राहकाला ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (LPG Cylinder booking paytm cashback) मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे हा कॅशबॅक पहिल्यांदाच पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक करणाऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी एका प्रोमोकोडची गरज लागणार आहे. 


हा कॅशबॅक मिळविण्यासाठी ग्राहकांना पेटीएमच्या प्रोमोकोड सेक्शनमध्ये जाऊन FIRSTLPG लिहावे लागणार आहे. यानंतरच गॅस बुकिंग करताना ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. या प्रोमोकोडचा वापर एकदाच करता येऊ शकतो. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच ठेवण्यात आली आहे.


कसा कराल गॅस सिलिंडर बुक....
पेटीएमवर गेल्यावर शो मोअरवर क्लिक करावे लागेल. यानंतर उजव्याबाजुला असलेल्या मेनूतून 'Recharge and Pay Bills' निवडावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला book a cylinder निवडावे लागणार आहे. यामध्ये तुमचा गॅस पुरवठादार, भारत गॅस, इंन्डेन गॅस आणि एचपी गॅस यापैकी निवडावा लागणार आहे. एलपीजी आयडी टाकल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करावे लागणार आहे. यावेळी तुम्हाला रक्कम दिसेल, त्याच्या वरच प्रोमोकोड टाकायचा आहे. 
 

Web Title: Great offer! Book a gas cylinder on Paytm; Get cashback up to Rs.500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.