lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ज्येष्ठांच्या ठेवींतून सरकारची कमाई; बचतीच्या व्याजावर २७ हजार कोटींचा कर

ज्येष्ठांच्या ठेवींतून सरकारची कमाई; बचतीच्या व्याजावर २७ हजार कोटींचा कर

ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भर मुदत ठेवींवर असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 07:02 AM2024-04-17T07:02:20+5:302024-04-17T07:03:21+5:30

ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भर मुदत ठेवींवर असतो.

Government revenue from senior citizens' deposits 27 thousand crores tax on savings interest | ज्येष्ठांच्या ठेवींतून सरकारची कमाई; बचतीच्या व्याजावर २७ हजार कोटींचा कर

ज्येष्ठांच्या ठेवींतून सरकारची कमाई; बचतीच्या व्याजावर २७ हजार कोटींचा कर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भर मुदत ठेवींवर असतो. त्यातून मिळणारे व्याज हे अनेकांचे उत्पन्नाचे तसेच उदरनिर्वाहाचे साधन असते. परंतु मागील आर्थिक वर्षात सरकारनेज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजावर आकारलेल्या करातूनसरकारला तब्बल २७ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. देशातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार संस्था स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन विभागाने जारी केलेल्या अहवालातून हे समोर आले आहे. 

- १४३ % इतकी वाढ मागील पाच वर्षात ज्येष्ठ नागरिकांनी मुदतठेवींच्या रुपाने बँकांमध्ये जमा केलेल्या एकूण रकमेत झाली आहे.
- ३४ लाख कोटी रुपये 
ज्येष्ठ नागरिकांनी २०२४ च्या आर्थिक वर्षात जमा केले. मागील वर्षी ही रक्कम १४ लाख कोटी इतकी होती.

व्याजापोटी वर्षभरात दिले २.७ लाख कोटी रुपये
- मुदतठेवींवर दिल्या जात असलेल्या जादा व्याजदरामुळे ज्येष्ठ नागरिकांचा मुदत ठेवींकडे कल अधिक वाढला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ७.३ लाख खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आलेल्या आहेत. यापैकी २.५७ लाख कोटी विविध बँकांमध्ये आहेत तर उर्वरित रक्कम ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतविण्यात आलेली आहे. 
- जमा झालेल्या ठेवींवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना २०२३-२४ या आर्थिक वर्षांत ठेवींवरील व्याजापोटी तब्बल २.७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या व्याजाच्या रक्कमेवर १० टक्के इतका कर लाला आहे. यातून सरकारला २७,१९६ कोटी मिळाले आहेत.

Web Title: Government revenue from senior citizens' deposits 27 thousand crores tax on savings interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.