lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर... PF वर अधिक व्याजाची 'दिवाळी भेट', ६ कोटी नोकरदारांना फायदा

खूशखबर... PF वर अधिक व्याजाची 'दिवाळी भेट', ६ कोटी नोकरदारांना फायदा

EPFO News : कर्माचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना सरकारने खूशखबर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:53 PM2019-09-17T14:53:12+5:302019-09-17T15:10:29+5:30

EPFO News : कर्माचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना सरकारने खूशखबर दिली आहे.

Good news : Increase in interest rates on PF, benefit to 6 crore employees | खूशखबर... PF वर अधिक व्याजाची 'दिवाळी भेट', ६ कोटी नोकरदारांना फायदा

खूशखबर... PF वर अधिक व्याजाची 'दिवाळी भेट', ६ कोटी नोकरदारांना फायदा

नवी दिल्ली - कर्माचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये पीएफवर 8.65 टक्के व्याज देण्याची घोषणा कामगारमंत्री  संतोष गंगवार यांनी केली आहे. याचा फायदा सुमारे सहा कोटींहून अधिक नोकरदारांना होणार आहे. 

 सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने गेल्या आर्थिक वर्षासाठी यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 8.65 टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आले होते. 

 दरम्यान, कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, ''येणाऱ्या उत्सव काळापूर्वी ईपीएफओ सहा कोटी पेक्षा अधिक सदस्यांना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी एकूण ठेवींवर 8.65 टक्के व्याज मिळेल. 2017-18 या आर्थिक वर्षांत पीएफवरील व्याजदर 8.55 टक्के एवढा होता.  

Web Title: Good news : Increase in interest rates on PF, benefit to 6 crore employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.