lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच EPFO ​​चे व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:25 PM2023-11-02T12:25:31+5:302023-11-02T12:28:26+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच EPFO ​​चे व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जाईल.

Good news for PF holders! 8.15 percent interest rate will be available; Know in detail | पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक निवेदन दिले आहे. यात असं म्हटे आहे की, कामगार मंत्रालय आर्थिक वर्ष २०२३ साठी पीएफ सदस्यांना एकूण ८.१५ टक्के व्याजदर देण्याच्या दिशेने काम करत आहे. एवढेच नाही तर एकूण २४ कोटी खात्यांमध्ये ८.१५ टक्के व्याज दिले आहे. ईपीएफओ व्याजदराबाबत सरकारची पावले योग्य दिशेने पडत असल्याबद्दल त्यांचे सरकार समाधानी असल्याचेही ते म्हणाले.

दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार! पेटीएम ॲपवर फॉलो करा 'ही' ट्रीक

EPFO स्थापना दिनानिमित्त कॅबिनेट मंत्र्यांनी माहिती दिली. ७१ व्या EPFO ​​स्थापना दिनी, केंद्रीय कामगार मंत्र्यांनी यावर भर दिला की सरकारचे उद्दिष्ट भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्राहकांच्या खात्यात योग्यवेळी आणि योग्य व्याजासह हस्तांतरित करणे आहे. ते म्हणाले की, २०२२-२३ मध्ये एकूण भविष्य निर्वाह निधी योगदान २.१२ लाख कोटी रुपये आहे, तर मागील वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये ही रक्कम १.६९ लाख कोटी रुपये होती.

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३४ वी बैठक मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी झाली. नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत बोर्डाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​चा वार्षिक अहवाल मंजूर केला आणि तो संसदेत सादर करण्याची शिफारस सरकारला केली.

२०२२-२३ आर्थिक वर्षात EPFO ​​चा एकूण गुंतवणूक निधी २१.३६ लाख कोटी रुपये आहे, यामध्ये पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी या दोन्ही रकमेचा समावेश आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ही रक्कम १८.३ लाख कोटी रुपये होती.

जर आपण एकूण गुंतवणुकीची रक्कम पाहिली तर ती ३१ मार्च २०२३ रोजी १३.०४ लाख कोटी रुपये होती आणि गेल्या वर्षी हा आकडा ११ लाख कोटी रुपये होता. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २.०३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

Web Title: Good news for PF holders! 8.15 percent interest rate will be available; Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.