lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि एशिया कप मोफत पाहता येणार

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि एशिया कप मोफत पाहता येणार

JioCinema ला आव्हान देण्यासाठी Disney+ Hotstar नं मोठं पाऊल उचललं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 03:33 PM2023-06-09T15:33:24+5:302023-06-09T15:34:04+5:30

JioCinema ला आव्हान देण्यासाठी Disney+ Hotstar नं मोठं पाऊल उचललं आहे.

Good news for cricket fans World Cup and Asia Cup can be watched for free disney plus hotstar big announsment | क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि एशिया कप मोफत पाहता येणार

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि एशिया कप मोफत पाहता येणार

जिओ सिनेमाला (JioCinema) आव्हान देण्यासाठी डिस्ने + हॉटस्टारनं (Disney+ Hotstar) मोठं पाऊल उचललं आहे. डिस्ने+ हॉटस्टारनं शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. आशिया कप आणि आयसीसी (पुरुष) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा त्यांच्या युझर्ससाठी मोफत दाखवण्यात येणार आहे.

डिस्ने + हॉटस्टारनं हे पाऊल अशा वेळी आले उचललंय जेव्हा रिलायन्स जिओनं आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे सामने मोफत दाखवले होते. दरम्यान, आशिया कप सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे, तर आयसीसी विश्वचषक २०२३ ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. दोन्ही स्पर्धा मोबाईल डिव्‍हाइसवरून स्‍ट्रीमिंगसाठी मोफत उपलब्‍ध असतील.

म्हणून उचललं पाऊल
भारतात तेजीनं विकसित होणाऱ्या ओटीटी उद्योगात डिस्ने + हॉटस्टार आघाडीवर राहिला आहे. आम्ही ग्राहकांना नवा अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आशिया कप आणि आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप लोकांसाठी उपलब्ध करून देण्यानं आमच्या इको सिस्टमला विकसित करण्यास आम्हाला मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे प्रमुख साजिथ शिवनंगन यांनी एक्सचेंज फॉर मीडियाला दिली.

रिलायन्सच्या Viacom18 ने २०२३ ते २०२७ या कालावधीत IPL डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क विकत घेतले आहेत. यापूर्वी ते Disney कडे होते. वायकॉमनं इतर कंपन्यांना मागे टाकत हे हक्क मिळवले आहेत.

Web Title: Good news for cricket fans World Cup and Asia Cup can be watched for free disney plus hotstar big announsment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.